Virat Kohli एका मोठ्या विक्रमाच्या जवळ, CSK विरुद्ध RCB सामन्यात रचणार इतिहास
जर त्याने आणखी 6 धावा केल्या तर तो टी-20 क्रिकेटमधील 12 हजार धावा पूर्ण करेल.
Virat Kohli Record IPL: आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. आयपीएलचा पहिला सामना 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) 6 धावा केल्याने तो टी-20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा पूर्ण करेल. विराट कोहलीने टी-20 मध्ये एकूण 376 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने खेळलेल्या 359 डावांमध्ये एकूण 11994 धावा केल्या आहेत. जर त्याने आणखी 6 धावा केल्या तर तो टी-20 क्रिकेटमधील 12 हजार धावा पूर्ण करेल. हा आकडा पार करणारा कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरणार आहे. या फॉरमॅटमध्ये 12 हजार धावा करणारा तो जगातील सहावा फलंदाज ठरणार आहे.
विराट कोहली टी-20 आकडेवारी
विराट कोहलीने 2007 मध्ये पहिला टी-20 सामना खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्याने आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 376 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 359 डावात फलंदाजी करताना 11994 धावा केल्या. (हे देखील वाचा: T20 WC 2024 पूर्वी ICC ने आणला नवा नियम, 'या' चुकीवर ठोठावला जाईल 5 धावांचा दंड)
विराट कोहलीचा टी-20 मध्ये सर्वोच्च धावसंख्या 122 धावा आहे, जी त्याने आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध केली होती.
विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये 8 शतके आणि 91 अर्धशतकं झळकावली आहेत.
विराट कोहलीने टी-20 मध्ये 1074 चौकार आणि 371 षटकार मारले आहेत.