अबब! Virat Kohli एका इंस्टाग्राम पोस्टसाठी घेतो करोडो रुपये, टॉप लिस्टमध्ये Cristiano Ronaldo ही सामील; आकडे पाहुन चक्रवाल
विराट कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने एक नवा पराक्रम केला आहे. अमेरिकेतील एका कंपनीने नुकताच अहवाल सादर केला. यामध्ये एका इंस्टाग्राम पोस्टसाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली.
भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याची फॅन फॉलोईंग जगभरात आहे. सध्या तो जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू म्हणून ओळखला असे असताना सोशल मीडियावर देखील त्याला फॉलो करणारे करोडो लोक आहेत. आता यात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने एक नवा पराक्रम केला आहे. अमेरिकेतील एका कंपनीने नुकताच अहवाल सादर केला. यामध्ये एका इंस्टाग्राम पोस्टसाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार विराट एका पोस्टसाठी भारतीय रुपया तब्बल 11.45 कोटी रुपये आकारतो. हा आकडा इतर कोणत्याही भारतीय सेलिब्रिटींपेक्षा खूप अधिक आहे. तर, पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) हा जगात इंस्टाग्रामवरून सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू ठरला आहे. तो एका पोस्टचे तब्बल 26.70 कोटी इतके पैसे घेतो. त्या पाठोपाठ अर्जंटीनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) 21.50 कोटी एका पोस्टसाठी मानधन घेताना दिसतो. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे.
Top 3 sportsmen in the world who earn the most per post on Instagram:
- Cristiano Ronaldo 26.70 Crore INR
- Lionel Messi 21.50 Crore INR
- Virat Kohli 11.45 Crore INR
Insane. Absolutely insane 🔥 pic.twitter.com/WR6cSi2VSk
— Farid Khan (@_FaridKhan) August 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 11, 2023 12:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

