हार्दिक पांड्या, केएल राहुल यांची संघातून हकालपट्टी, विजय शंकर आणि शुभमन गिल यांना भारतीय संघात स्थान

त्यामुळे पांड्या आणि राहुल यांची संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Hardik Pandya and KL Rahul (Photo Credits: Instagram)

हार्दिक पांड्या (Hardik Pandya)  आणि केएल राहुल (K L Rahul) यांनी उपस्थिती लावलेल्या 'कॉफी विथ करण' (Koffee with Karan) या कार्यक्रमाचे प्रकरण दोघांना चांगलेच भोवले आहे. त्यामुळे पांड्या आणि राहुल यांची संघातून हकालपट्टी करण्यात आली असून त्या जागी संघात आता विजय शंकर (Vijay Shankar) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांना स्थान देण्यात आलेले आहे. याबाबत शनिवारी रात्री बीसीसीआयने माहिती दिली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासह न्यूझिलंड सोबतच्या दौऱ्यातही विजय शंकर आणि शुभमन गिल यांची वर्णी लागणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, विजय शंकर ह्याला ऑस्ट्रिलिया मध्ये खेळवण्यात येणाऱ्या एकदिवशी क्रिकेट सामन्यासह न्यूझिलंड येथील दौऱ्यामध्ये संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. तर शुभमन गिल ह्याला न्युझिलंड येथे होणाऱ्या एकदिवशीय आणि टी20 सिरिजमध्ये खेळण्यास संधी मिळणार आहे.(हेही वाचा- करणची कॉफी चांगलीच भोवली; ब्रँडनी रद्द केले जाहिरातींचे करार)

तमिळनाडू मधील विजय शंकर हा मिडल ऑर्डर फलंदाज आहे.तसेच विजय शंकरने आता पर्यंत टी20 चे एकूण 5 सामने खेळला आहे. तर गिल ह्याने अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये शानदार खेळी केली होती.तसेच उपात्यंपूर्व फेरीत भारतीय संघाला जिंकून देण्यासाठी गिल याने मोलाचा वाटा उचलला होता. त्याने 102 धावा काढून संघाला 272 एवढा मोठी धावसंख्या मिळवून दिली. परंतु गिल याने अद्याप कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना खेळला नाही आहे.