Syed Mushtaq Ali Trophy: दीपक चाहर याच्यानंतर 'या' भारतीय गोलंदाजानेही घेतली हॅटट्रिक, पण झाली नाही चर्चा, जाणून घ्या
मंगळवारीचा दीपक चाहरप्रमाणे उत्तराखंडचा डावखुरा फिरकीपटू मयंक मिश्राने काल सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला. गोवा विरुद्ध विशाखापट्टणममध्ये झालेल्या सामन्यात मिश्राने हॅटट्रिक घेतली. मिश्राने दुसर्या ओव्हरच्या 3, 4 आणि 5 व्या चेंडूवर गोव्याचे फलंदाज आदित्य कौशिक, अमित वर्मा, सुयश प्रभुदेसाई यांना सलग तीन चेंडूंत बाद केले
रविवारी बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध खेळल्या गेलेल्या नागपूर टी-20 मध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) याने हॅटट्रिक केली तेव्हापासून जणू प्रत्येक गोलंदाज हॅटट्रिक घेत आहे. रविवारी बांग्लादेशविरुद्ध हॅटट्रिक घेतल्यानंतर दीपकने मंगळवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेतील विदर्भाविरूद्ध मॅचमध्ये हॅटट्रिक घेतली. यानंतर मंगळवारीचा दीपकप्रमाणेच आणखी एका भारतीय गोलंदाजाने हॅटट्रिक घेतली, पण याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. उत्तराखंडचा (Uttarakhand) डावखुरा फिरकीपटू मयंक मिश्रा (Mayank Mishra) याने काल सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला. गोवा विरुद्ध विशाखापट्टणम (Visakhapatnam) मध्ये झालेल्या सामन्यात मिश्राने हॅटट्रिक घेतली. मिश्राने दुसर्या ओव्हरच्या 3, 4 आणि 5 व्या चेंडूवर गोव्याचे फलंदाज आदित्य कौशिक, अमित वर्मा, सुयश प्रभुदेसाई यांना सलग तीन चेंडूंत बाद केले आणि हॅटट्रिकची नोंद केली. (Syed Mushtaq Ali Trophy: दीपक चाहर याची सर्वोकृष्ट कामगिरी; केवळ 3 दिवसात घेतली दुसरी हॅट्रिक)
मयांक मिश्राच्या या घातक गोलंदाजीने गोवाने त्यांचे 4 फलंदाज केवळ 7 धावांवर गमावले आणि त्यांना उत्तराखंडला 120 धावांचे लक्ष्य देता आले. गोवाचा हा छोटा स्कोर उत्तराखंड संघाने 2 गडी गमावून मिळवला. मयंकने मागील वर्षी लिस्ट ए आणि रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण केले. 29 वर्षांच्या मयंकने आतापर्यंत 5 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये मयंकने 9 लिस्ट ए सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत.
मयंक उत्तराखंडकडून हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाजही ठरला आहे. उत्तराखंडने टॉस जिंकून गोव्याला पहिले फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गोव्याकडून स्नेहुलने 57 धावा केल्या. त्याच्याशिवाय उत्तराखंडच्या गोलंदाजीसमोर दुसरा कोणताही फलंदाज बराच काळ क्रिजवर टिकू शकला नाही. हीरामब परब याने 22 आणि लक्ष्य गर्ग (Lakshya Garg) याने 18 धावांचे योगदान दिले. उत्तराखंडकडून मयंकने चार, सन्नी राणा आणि राहिल शाह यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात फलंदाजी करणवीर कौशल 35 धावांच्या महत्त्वपूर्ण योगदानासह पॅवेलियनमध्ये परतला. त्यानंतर तन्मय श्रीवास्तवने सौरभ रावतबरोबर दीर्घ भागीदारी रचली आणि मैदानावर चहूबाजूला शॉट्स खेळले. तन्मयने नाबाद 49 धावा केल्या, तर सौरभची नाबाद 31 धावांची खेळीही विशेष ठरली. उत्तराखंडने 16.4 ओव्हरमध्ये 120 धावा केल्या आणि सामना आठ गडी राखून जिंकला. गोव्याकडून अमूल्या आणि एम सिरूर यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)