पाऊस जोमात Pakistan कोमात! USA vs IRE सामन्यात पावसाची हजेरी, जाणून घ्या सुपर-8 चे समीकरण
तर, तिसऱ्या सामन्यात कॅनडाविरुद्ध विजय मिळावला. पण, आता पाकिस्तानला सुपर-8 मधील प्रवेश मिळेण अवघड दिसत आहे. कारण, आज अमेरिका आणि आयर्लंड (USA vs IRE) यांच्याच सामना खेळवला जाणार आहे. परंतु या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याणे नाणेफेकला उशीर झाला आहे.
USA vs IRE: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) पाकिस्तानवर (Pakistan) टांगती तलवार लटकली आहे. पाकिस्तानला भारत आणि अमेरिकेविरुद्ध पराभव पत्कारावा लागला आहे. तर, तिसऱ्या सामन्यात कॅनडाविरुद्ध विजय मिळावला. पण, आता पाकिस्तानला सुपर-8 मधील प्रवेश मिळेण अवघड दिसत आहे. कारण, आज अमेरिका आणि आयर्लंड (USA vs IRE) यांच्याच सामना खेळवला जाणार आहे. परंतु या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याणे नाणेफेकला उशीर झाला आहे. त्यामुळे बाबर सेनाच्या मनात धुकधुक वाढली असेल. तसेच, सुपर-8 च्या दृष्टिकोनातून आजचा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यातील विजयाचा फायदा यूएसएला (USA) होऊ शकतो, तर विजयाची नोंद करून आयर्लंडला सुपर-8 मध्ये जाण्याच्या आशाही जिवंत ठेवता येतील.
पाकिस्तानसाठी आजचा सामना म्हत्वाचा
दुसरीकडे, हा सामना पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे कारण बाबर आणि कंपनी सुपर-8 मध्ये जाईल की नाही हे या सामन्यावर अवलंबून आहे. चला तर मग जाणून घेऊया यूएसए विरुद्ध आयर्लंड सामन्याचा निकाल अ गटातील सुपर-8 चे समीकरण कसे बिघडू शकते. (हे देखील वाचा: IND vs AFG T20 World Cup 2024: सुपर 8 मध्ये अफगाणिस्तानच आणि टीम इंडियाची होणार लढत, जाणून घ्या कधी आणि कुठे खेळवला जाणार सामना)
पाकिस्तानचा तीन सामन्यात फक्त एकच विजय
पाकिस्तानने आतापर्यंत 3 सामन्यांत फक्त एकच विजय नोंदवला आहे. पाकिस्तान संघ सध्या अ गटात 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि त्याचा निव्वळ धावगती +0.191 आहे. तर यूएसएचे 3 सामन्यांत दोन विजयांसह 4 गुण आहेत. यजमान संघ सध्या टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे आणि त्याचा निव्वळ धावगती +0.127 आहे. अमेरिकेने आयर्लंडविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत जिंकू नये, अशी पाकिस्तान संघ आणि त्यांच्या चाहत्यांची इच्छा असेल. कारण अमेरिका हरले तरच पाकिस्तानची सुपर-8 मध्ये जाण्याची आशा जिवंत राहू शकते.
फ्लोरिडामध्ये पावसाचा धुमाकुळ
तुम्हाला सांगतो की अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना लॉडरहिल, फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियमवर होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात सतत पाऊस पडत असून फ्लोरिडाच्या अनेक भागात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. यूएसए आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता हवामान स्थिती दर्शवत आहे. अशा परिस्थितीत सामना रद्द होऊ शकतो.
यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना रद्द झाल्यास तर काय होणार?
यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. या प्रकरणात यूएसएला 5 गुण मिळतील. अ गटात सध्या पाकिस्तान आणि कॅनडाची स्थिती अशी आहे की हे दोन्ही संघ आता जास्तीत जास्त 4 गुण गोळा करू शकतात. त्यामुळे यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे वाहून गेला तर आयर्लंड व्यतिरिक्त पाकिस्तान आणि कॅनडा देखील सुपर-8 च्या शर्यतीतून बाहेर होतील. तर यूएसए संघ पुढील टप्प्यात जाऊन इतिहास रचू शकतो.