IND vs SL, U19 Asia Cup Final LIVE Streaming: भारत अंडर-19 विरुद्ध श्रीलंका अंडर-19 आशिया कप फायनल सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पाहणार?
भारत विरुद्ध श्रीलंका अंडर-19 आशिया चषक सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि लाइव्ह स्ट्रीमिंगची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11:00 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.
U19 Asia Cup Final LIVE Streaming: दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर 14 चित्तथरारक सामन्यानंतर ACC अंडर-19 आशिया चषक ( U19 Asia Cup) 2021 आता आपल्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे आणि भारत (India) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) विजेतेपदाच्या लढतीत आमनेसामने येणार आहेत. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. भारताने बांगलादेशचा 103 धावांनी पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला तर श्रीलंकेने यूएईमध्ये गुरुवारी दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा पराभव करून अंतिम सामन्यात धडक मारली. दरम्यान अंडर-19 आशिया कप स्पर्धेचे सामने भारतात थेट प्रक्षेपित किंवा ऑनलाईन स्ट्रीमिंग केले नसले तरी आता भारतीय चाहते अंतिम सामन्याचा आनंद नक्की लुटू शकतील. भारत विरुद्ध श्रीलंका अंडर-19 आशिया चषक सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि लाइव्ह स्ट्रीमिंगची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे. (U19 Asia Cup 2021: युवा टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, बांगलादेश अंडर-19 संघाला 103 धावांनी लोळवलं; श्रीलंकेशी विजेतेपदासाठी भिडणार)
भारत विरुद्ध श्रीलंका आशिया कप अंडर-19 2021 फायनल सामना 31 डिसेंबर 2021 रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 11:00 वाजता दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय चाहते फक्त आशिया कप अंडर-19 फायनल सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर लाइव्ह पाहू शकतात. तर भारत अंडर-19 विरुद्ध बांग्लादेश अंडर-19 आशिया कप 2021 फायनल सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड अॅपवर उपलब्ध असेल. स्पर्धेत भारतीय युवा संघाच्या खेळाबद्दल बोलायचे तर भारताचा एकमेव पराभव पाकिस्तान U19 विरुद्ध झाला. तसेच त्यांनी गटातील सर्व सामन्यात एकतर्फी विजय मिळवला असल्यामुळे श्रीलंकेविरुद्ध देखील ते विजयाचे प्रभात दावेदार असतील. मात्र श्रीलंका संघाला ते हलक्यात घेऊ शकत नाही विशेषतः पाकिस्तानविरुद्ध कमी धावसंख्येच्या सामन्यानंतर तर नाही.
ACC अंडर-19 आशिया कप 2021 संघ:
भारत अंडर-19: यश धूल (कॅप्टन), हरनूर सिंह पन्नू, अंगक्रिश रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशीद, अन्नेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, दिनेश बाना (विकेटकीपर), आराध्या यादव (विकेटकीपर), राजांगडवा , राजवर्धन हंगरगेकर, गरव सांगवान, रवी कुमार, ऋषिथ रेड्डी, मानव पारख, अमृत राज उपाध्याय, विकी ओस्तवाल, वासू वत्स (फिटनेस मंजुरीच्या अधीन).
श्रीलंका अंडर-19: ड्युनिथ वेललागे (कॅप्टन), सदेश जयवर्धने, शवॉन डॅनिया, पवन पाथिराजा, मथीशा पाथिराना, विबाहविथ एहेलापोला, त्रावीन मॅथ्यूज, चामिडू विक्रमसिंघे, लाहिरू अबेसिंघे, लाहिरू देवतागे, दानल हेमानंदा, पवनू कुमारशेन, पवनू, पवनू, , ससांका निर्मल, रायन फर्नांडो, यासिरू रॉड्रिगो, रवीन डी सिल्वा, विनुजा रणपुल, अभिषेक लियानाराची, सदिशा राजपक्षे, मथीसा वीरासिंघा, मलशा थारुपती, हरिंदू जयसेकेरा, बवंता जयसिंघे आणि मलेशा सिल्वा.