U19 Asia Cup 2021: युवा टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, बांगलादेश अंडर-19 संघाला 103 धावांनी लोळवलं; श्रीलंकेशी विजेतेपदासाठी भिडणार

U19 Asia Cup 2021: यश धुलच्या नेतृत्वात भारतीय अंडर-19 संघाने आशिया कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे आणि आता त्यांचा सामना श्रीलंकेशी होईल. उपांत्य फेरीत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 243 धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशचा डाव 38.2 षटकात अवघ्या 140 धावांत आटोपला. दुसरीकडे, श्रीलंकेने पाकिस्तानवर मात करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.

U19 Asia Cup 2021: युवा टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, बांगलादेश अंडर-19 संघाला 103 धावांनी लोळवलं; श्रीलंकेशी विजेतेपदासाठी भिडणार
U19 आशिया कप 2021 भारत (Photo Credit: Twitter/ACCMedia1)

U19 Asia Cup 2021: यश धुलच्या (Yash Dhull) नेतृत्वात भारतीय अंडर-19 संघाने आशिया कपच्या (Asia Cup) अंतिम फेरीत धडक मारली आहे आणि आता त्यांचा सामना श्रीलंकेशी (Sri Lanka) होईल. श्रीलंकेने पाकिस्तानवर मात करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना बांगलादेशशी झाला. टीम इंडियाने (Team India) प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 243 धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशचा डाव 38.2 षटकात अवघ्या 140 धावांत आटोपला आणि सामना 103 धावांनी जिंकला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2021 06:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).