TRA vs SUP, Women's T20 Challenge 2020 Final Live Streaming: ट्रेलब्लेझर सुपरनोव्हास यांच्यातील महिला टी-20 चॅलेंज फायनल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
ट्रेलब्लेझर आणि सुपरनोव्हास यांच्यात महिला टी-20 चॅलेंजचा यंदाचा अंतिम सामना खेळला जाईल. दोन क्रिकेट सुपरस्टार आणि जगातील हार्ड-हिटिंग फलंदाज यांच्यात ही लढाई असेल. आजच्या महिला टी-20 चॅलेंज फायनल सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण भारतीय प्रेक्षकांना सर्व स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अॅपवर ऑनलाईन या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
Women's T20 Challenge 2020 Final Live Streaming: ट्रेलब्लेझर (Trailblazers) आणि सुपरनोव्हास (Supernovas) यांच्यात महिला टी-20 चॅलेंजचा यंदाचा अंतिम सामना खेळला जाईल. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौरचा (Harmanpreet Kaur) संघ आज विजेते पदाच्या लढतीसाठी आमने-सामने येतील. दोन क्रिकेट सुपरस्टार आणि जगातील हार्ड-हिटिंग फलंदाज यांच्यात ही लढाई असेल. आजच्या अंतिम सामन्यात पूनम यादव, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, चमारी अटापट्टू आणि डियांड्रा डॉटिन मोठ्या प्रमाणावर आपली ओळख पटवताना दिसतील. ट्रेलब्लेझर आणि सुपरनोव्हास यांच्यातील आजच्या महिला टी-20 चॅलेंज फायनल (Women's T20 Challenge Final) सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण भारतीय प्रेक्षकांना सर्व स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अॅपवर ऑनलाईन या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. संध्याकाळी 7:00 वाजता टॉस होणार तर सामना अर्धातास नंतर म्हणजेच 7:30 वाजल्यापासून सुरु होईल. (Women's T20 Challenge 2020: Supernovas चा मनोरंजक विजय; Trailblazers चा 2 धावांनी पराभव करत फायनलमध्ये मारली धडक)
ट्रेलब्लेझरने पहिल्या सामन्यात विजय मिळवला असला तरी दुसऱ्या सामन्यात त्यांना अवघ्या दोन धावांनी सुपरनोव्हासकडून पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे, सुपरनोव्हासचा पहिल्या सामन्यात विजय मिळवला असला तरी फायनलमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी त्यांनी दमदार खेळ केला आणि ट्रेलब्लेझरवर बॅट आणि बॉलने वर्चस्व गाजवून शानदार विजय मिळवला. होता. सुपरनोव्हासने यापूर्वी दोनदा स्पर्धा जिंकली असून त्यांचे हॅटट्रीकवर लक्ष असेल, तर ट्रेलब्लेझर पहिल्यांदा विजेतेपदाच्या निर्धारित असतील.
पाहा ट्रेलब्लेझर आणि सुपरनोव्हास संघ
ट्रेलब्लेझर: स्मृति मंधाना (कॅप्टन), पुनम राऊत, डिएंड्रा डॉटिन, दयालन हेमलता, दीप्ति शर्मा, सलमा खातुन, नुजत परवीन (विकेटकीपर), नट्टकन चंटम, राजेश्वरी गायकवाड, सोफी एक्लस्टोन, झूलन गोस्वामी, हर्लीन देओल, रिचा घोष, काश्वी गौतम, सिमरन बहादुर.
सुपरनोव्हास: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमीमाह रॉड्रिग्ज, चमारी अटापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (विकेटकीपर), शशिकला सिरीवर्डेन, पूनम यादव, शकेरा सेलमन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकर, आयुषी सोनी, आयबोंगा खाका, मुस्कान मलिक.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)