IND W vs AUS W 1st T20 Head To Head: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज होणार हाय व्होल्टेज सामना, येथे जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी आणि सामन्याशी संबंधित सर्व तपशील
याआधी टी-20 मालिकेतही टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक होती. 6 डिसेंबरपासून इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत टीम इंडियाला 1-2 ने पराभवाचा सामना करावा लागला होता.
IND W vs AUS W 1st T20: एकदिवसीय मालिकेतील पराभवनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दोन्ही महिला संघामध्ये 3 सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका आजपासून सुरू होत आहे. या मालिकेत भारतीय संघाला खास रणनीती घेऊन उतरावे लागणार आहे. यावर्षी होणार्या आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या (ICC World Cup 2024) पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी (Team India) ही मालिका खूप महत्त्वाची आहे. संघ आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सहा वेळा विश्वविजेता ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरेल. तत्तपुर्वी या दौऱ्याची सुरुवात दोन्ही संघांमधील एकमेव कसोटी सामन्याने झाली. या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. यानंतर दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 3-0 असा पराभव केला.
कर्णधार हरमनप्रीत कौरची टीम टी-20 च्या माध्यमातून वनडे मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्यास सज्ज झाली आहे. याआधी टी-20 मालिकेतही टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक होती. 6 डिसेंबरपासून इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत टीम इंडियाला 1-2 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. (हे देखील वाचा: T20 World Cup 2024 Schedule: जगभरातील क्रिकेट चाहत्यांची आज प्रतीक्षा संपणार, संध्याकाळी 7 वाजता जाहीर होणार टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक)
खेळपट्टीचा अहवाल
डीवाय पाटील स्टेडियमवर रोमांचक सामन्याची पूर्ण अपेक्षा आहे. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना अधिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे. या मैदानावर उच्च स्कोअरिंग सामना पाहता येईल. या मैदानावर फलंदाजांना नेहमीच मदत मिळाली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामनाही उच्च स्कोअरिंग ठरू शकतो.
हेड टू हेड रेकॉर्ड
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 31 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने केवळ सहा सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने 23 सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. भारतीय भूमीवर या दोघांमध्ये आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले गेले आहेत. या दौऱ्यात टीम इंडियाला फक्त एकच विजय मिळवता आला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघाने 10 सामने जिंकले आहेत.
भारतीय टी-20 संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक , रेणुका सिंग ठाकूर , तीतस साधू , पूजा वस्त्रकार , कनिका आहुजा, मिन्नू मणी.
ऑस्ट्रेलिया संघः अॅलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, हीदर ग्रॅहम, ऍशले गार्डनर, किम गर्थ, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अॅलाना किंग, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा (उपकर्णधार), बेथ मूनी (विकेटकीपर), एलिस पेरी, मेगन शुट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम.