IND vs AUS 3rd Test 2024 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी वेळत बदल, आता यावेळी सुरु होणार सामना; जाणून घ्या तपशील
हे मैदान ब्रिस्बेनचे गाबा (Gabba) आहे. गेल्या वेळी गाब्बामध्ये निर्णायक सामना खेळला गेला होता ज्यात भारताने विजय मिळवून मालिका जिंकली होती.
India National Cricket Team vs Australia Men's National Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने झाले आहेत. दोन सामन्यांनंतर मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरा सामना होणार आहे जिथे ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व आहे आणि गेल्या दौऱ्यात भारताने त्यांना येथे पराभूत केले आहे. हे मैदान ब्रिस्बेनचे गाबा (Gabba) आहे. गेल्या वेळी गाब्बामध्ये निर्णायक सामना खेळला गेला होता ज्यात भारताने विजय मिळवून मालिका जिंकली होती. यावेळीही गाबाची लढत सोपी होणार नाही. या मैदानावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व असून भारताने या मैदानावर केवळ एकच सामना जिंकला आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळेत बदल
मालिकेत आघाडी घेण्यासाठी उत्सुक असलेल्या दोन्ही संघांचे लक्ष या सामन्याकडे लागले असून चाहतेही या सामन्याची वाट पाहत आहेत. मात्र चाहत्यांना यासाठी वेळ बदलावा लागेल. ब्रिस्बेन येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. या सामन्याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगतो. (हे देखील वाचा: India's WTC Final Scenario: कांगारूंकडून मालिका 3-2 ने गमावल्यानंतरही भारत कसा पोहचणार फायनलमध्ये? एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण समीकरण)
भारतीय वेळेनुसार पहाटे 5:50 वाजता सुरू होणार सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. हा ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर खेळवला जाणार आहे. तसेच तिसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 5:50 वाजता सुरू होईल तर नाणेफेक पहाटे 5:20 वाजता होईल.
कुठे पाहणार लाइव्ह सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना स्टार स्पोर्ट्स चॅनलवर थेट पाहता येईल. तसेच सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने-हॉटस्टार उपलब्ध आहे.