आजपासून सुरु होणार लीजेंड्स लीग क्रिकेटचा थरार, जाणून घ्या वेळापत्रक आणि लाईव्ह स्ट्रीमिंगशी संबंधित प्रत्येक माहिती
दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल.
कतारची राजधानी दोहा येथे खेळल्या जाणाऱ्या लिजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket 2023) या जागतिक स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मोसमातील पहिला सामना 10 मार्च रोजी दोहा येथील एशियन टाऊन क्रिकेट स्टेडियमवर (Asian Town Cricket Stadium) होणार आहे. पहिल्या सामन्यात आशिया लायन संघाचा सामना भारत महाराजाविरुद्ध होणार (Asia Lions vs India Maharajas) आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. हा सामना मोबाईल आणि टीव्हीवर सहज पाहता येणार आहे. (हे देखील वाचा: Mumbai Indians New Jersey: मुंबई इंडियन्सची नवी जर्सी रिलीज, रोहित शर्माचा पलटण दिसणार आता नव्या अवतारात)
कधी आणि कुठे पाहणार सामना?
लिजेंड्स लीग क्रिकेटचा थरार स्टार स्पोर्ट्सवर रात्री 8 वाजल्यापासून लिजेंड्स क्रिकेट लीगचे सर्व सामने टीव्हीवर पाहता येतील. तसेच ते सर्व सामने Disney+ Hotstar वर मोबाईलवर आणि Jio TV वर मोफत पाहता येणार आहे.
'या' दिवशी होणार सामने
LLC 2023 Full Schedule
Date | Match | Time (in IST) | Venue |
March 10 | India Maharajas vs Asia Lions | 8:00 PM | West End Park International Cricket Stadium, Doha |
March 11 | World Giants vs India Maharajas | 8:00 PM | West End Park International Cricket Stadium, Doha |
March 13 | Asia Lions vs World Giants | 8:00 PM | West End Park International Cricket Stadium, Doha |
March 14 | Asia Lions vs India Maharajas | 8:00 PM | West End Park International Cricket Stadium, Doha |
March 15 | India Maharajas vs World Giants | 8:00 PM | West End Park International Cricket Stadium, Doha |
March 16 | World Giants vs Asia Lions | 8:00 PM | West End Park International Cricket Stadium, Doha |
March 18 | Eliminator | 8:00 PM | West End Park International Cricket Stadium, Doha |
March 20 | Final | 8:00 PM | West End Park International Cricket Stadium, Doha |
पहा तिन्ही संघाचे खेळाडू
India Maharajas squad: गौतम गंभीर (कर्णधार), सुरेश रैना, मुरली विजय, मोहम्मद कैफ, स्टुअर्ट बिन्नी, इरफान पठाण, रॉबिन उथप्पा, मनविंदर बिस्ला, एस श्रीशांत, अशोक दिंडा, परविंदर अवाना, प्रवीण तांबे, हरभजन सिंह आणि प्रवीण कुमार.
Asia Lions squad: शाहिद आफ्रिदी (कर्णधार), मुथय्या मुरलीधरन, असगर अफगाण, मिसबाह-उल-हक, राजिन सालेह, अब्दुल रज्जाक, पारस खडका, थिसारा परेरा, तिलकरत्ने दिलशान, उपुल थरंगा, अब्दूर रज्जाक, दिलहारा फर्नांडो, शोएब अख्तर, मोहम्मद हाफीज, सोहेल तन्वीर, मोहम्मद आमिर
World Giants squad: आरोन फिंच (कर्णधार), लेंडल सिमन्स, इऑन मॉर्गन, रॉस टेलर, ख्रिस गेल, हाशिम आमला, पॉल कॉलिंगवूड, केविन ओब्रायन, शेन वॉटसन, अल्बी मॉर्केल, जॅक कॅलिस, मॉर्न व्हॅन विक, मॉन्टी पानेसर, मॉर्न मॉर्केल, आणि ब्रेट ली