'मला वाटलं मस्करी करतोय'! जेव्हा सचिन तेंडुलकरने इंग्लंडच्या 'या' खेळाडूला दिली होती मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची ऑफर
इंग्लंड संघाकडून 101 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्या अष्टपैलू ल्यूक राईटने आयपीएलबाबत मोठा खुलासा केला आहे. इंग्लंडच्या खेळाडूने असे म्हटले की, महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याने जेव्हा आयपीएलसाठी त्याला ऑफर दिली तेव्हा माझा विश्वास नव्हता. राइटला वाटले की सचिन मस्करी करत आहे.
इंग्लंड (England) संघाकडून 101 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्या अष्टपैलू ल्यूक राईटने (Luke Wright) आयपीएलबाबत (IPL) मोठा खुलासा केला आहे. इंग्लंडच्या खेळाडूने असे म्हटले की, महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने जेव्हा आयपीएलसाठी त्याला ऑफर दिली तेव्हा माझा विश्वास नव्हता. राइटला वाटले की सचिन मस्करी करत आहे. सचिनने स्वत: राईटला विचारले होते की, आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सकडून खेळू इच्छित आहे का? 2008 मध्ये इंग्लंडचा फलंदाज राईटला आयपीएलमध्ये खेळायचे होते, पण क्रिकेट मंडळाने परवानगी नाकारल्याने त्याला आणि अनेक खेळाडूंना या स्पर्धेला मुकावे लागले. सचिनने दिलेली ऑफर गमावल्याने आता राईटला दुःख होत आहे आणि त्याने स्वतः हे बोलून दाखवले आहे. राईट त्यावेळी टी-20 क्रिकेटमधील मजबूत खेळाडू होता. पिच हिटिंग तसेच मध्यम वेगवान गोलंदाजीमध्येही त्याच्याकडे अनेक व्हेरिएशन होते. तो म्हणाला की दिग्गज फलंदाजाने त्याला फोन केला हे त्याच्यासाठी अविश्वसनीय होते. ('सचिन तेंडुलकर याला शोएब अख्तरच्या बॉलिंगवर घाबरताना पाहिलं!' 2006 कराची टेस्ट आठवण करत मोहम्मद असिफने केला दावा)
विस्डेनच्या पॉडकास्टमध्ये राईट म्हणाला,“इंग्लंडच्या संघाकडून कारकिर्द घडवण्याआधी विविध टी-20 लीग स्पर्धांमध्ये खेळले पाहिजे अशा मताचा मी होतो. अशा स्पर्धांमधून खेळाचा थोडा अनुभव येतो. आजच्या खेळाडूंना याचाच फायदा मिळतो. मी जेव्हा पहिलं आयपीएल खेळू शकलो नाही. त्यानंतर सचिनने मला फोन करून ऑफरदेखील दिली की तू मुंबईकडून आयपीएल खेळ… पण त्यावेळी मला वाटलं होतं की सचिन मस्करी करतोय. त्यामुळे मी काहीच बोललो नाही.” मुंबई व्यतिरिक्त ल्यूक पुणे वॉरियर्सकडूनही आयपीएलमध्ये खेळला आहे.
दरम्यान, ल्यूकला आयपीएलमध्ये काही खास कामगिरी करता आली नाही. 2012 मध्ये त्याने पुणे वॉरियर्सकडून पदार्पण केले आणि दिल्लीविरूद्ध एका सामन्यात त्याने सामनवीराचा पुरस्कार पटकावला. 2 वर्षांच्या कालावधीत त्याला केवळ 7 सामन्यात खेळायची संधी मिळाली, ज्यात त्याने एकूण 106 धावा आणि केवळ 2 फक्त गडी बाद केले. त्याआधी तो बीबीएलमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळला होता आणि नंतर बीपीएल आणि पीएसएलचाही अनुभव मिळविला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)