IPL Auction 2025 Live

MS Dhoni Sixes Record: आयपीएलच्या इतिहासात एमएस धोनीच्या नावावर नोंदला आहे हा अनोखा विक्रम, आकडे पाहून तुम्हीही व्हाल थक्क

गेल्या बुधवारी म्हणजेच 10 मे रोजी झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात एमएस धोनीने पुन्हा एकदा 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 20 धावांची जलद खेळी करून चाहत्यांची मने जिंकली.

MS Dhoni

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16व्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. गेल्या बुधवारी म्हणजेच 10 मे रोजी झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात एमएस धोनीने पुन्हा एकदा 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 20 धावांची जलद खेळी करून चाहत्यांची मने जिंकली. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत एमएस धोनी चौथ्या क्रमांकावर आहे, पण डेथ ओव्हरमध्ये षटकार मारण्याच्या बाबतीत एमएस धोनी अव्वल आहे. (हे देखील वाचा: Yashasvi Jaiswal New Record: यशस्वी जैस्वालने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदांज)

एमएस धोनीने डेथ ओव्हरमध्ये सर्वाधिक मारले आहेत षटकार 

आयपीएलच्या 16व्या सीझनमध्ये एमएस धोनीला आतापर्यंत फिनिशर म्हणून पाहिले जात आहे. या मोसमात आतापर्यंत धोनीच्या बॅटमधून 10 षटकार निघाले आहेत. धोनीने आयपीएलच्या 20 षटकांसह 18व्या आणि 19व्या षटकांमध्ये सर्वाधिक षटकार मारले आहेत. गेल्या तीन षटकांमध्ये धोनीने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 136 षटकार ठोकले आहेत.

कोणत्या षटकात किती षटकार

एमएस धोनीने आयपीएलच्या 18व्या षटकात 39 षटकार ठोकले.

एमएस धोनीने आयपीएलच्या 19व्या षटकात 38 षटकार ठोकले.

एमएस धोनीने आयपीएलच्या 20व्या षटकात 59 षटकार ठोकले.

आतापर्यंत 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.

उत्कृष्ट स्ट्राईक रेटने केल्या धावा

आयपीएलच्या 16व्या हंगामात महेंद्रसिंग धोनी 204.26 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने धावा करत आहे. धोनीने या मोसमातील 8 डावांमध्ये 47 चेंडूंचा सामना केला आहे, ज्यामध्ये त्याने 96 धावा केल्या आहेत. धोनीची स्पर्धेत सरासरी 48 आहे. चेन्नईचा कर्णधार 6 डावात नाबाद परतला आहे. दुसरीकडे, जर आपण एमएस धोनीच्या एकूण आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर धोनीने 246 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 214 डावांमध्ये फलंदाजी करताना धोनीने 39.33 च्या सरासरीने आणि 136.07 च्या स्ट्राइक रेटने 5074 धावा केल्या. यादरम्यान धोनीने एकूण 24 अर्धशतके झळकावली आहेत.