IND vs SA ICC World Cup 2023: वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसा आहे विक्रम? येथे पाहा आकडेवारी
तर दक्षिण आफ्रिकेने 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. आता या दोन संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. सध्याच्या एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत फक्त दोन संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यापैकी एक यजमान संघ भारत आणि दुसरा दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे.
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील सामना उद्या म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने या वर्ल्ड कपमध्ये सलग सात सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. आता या दोन संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. सध्याच्या एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत फक्त दोन संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यापैकी एक यजमान संघ भारत आणि दुसरा दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. टीम इंडियाने 7 सामने खेळून सर्व सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला तेवढ्याच सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशा परिस्थितीत तमाम क्रिकेट चाहते या दोन संघांमधील सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. (हे देखील वाचा: PAK Beat NZ: पाकिस्तानने DLS पद्धतीने न्यूझीलंडचा केला पराभव, फखर जमानच्या ऐतिहासिक खेळीने उपांत्य फेरीच्या आशा जिंवत)
वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत टीम इंडियावर दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व
वनडे विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा रेकॉर्ड पाहिला तर दक्षिण आफ्रिकेचा संघ वरचढ असल्याचे दिसून येते. विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 5 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने दोन सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने 3 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने 2015 आणि 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेने 2011, 1999 आणि 1992 मध्ये विजेतेपद पटकावले होते. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन्ही संघांच्या एकमेकांविरुद्धच्या विक्रमाकडे पाहिले तर त्यातही दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा वरचष्मा आहे. टीम इंडिया आणि आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 90 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी टीम इंडियाने 37 जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने 50 सामने जिंकले आहेत. याशिवाय तीन सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
दोन्ही सघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.