IPL इतिहासात मुंबई इंडियन्सच्या नावे सर्वाधिक पाच विजेतेपदं, पण केवळ ‘या’ 4 स्फोटक फलंदाजांनी झळकावली आहेत झंझावाती शतके
मुंबईला यशस्वी करण्यात अनेक खेळाडूंचा मोलाचा वाटा राहील आहे. पण आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत केवळ 4 स्फोटक फलंदाजांनी शतक झळकावले आहे. या यादीत 2 भारतीय फलंदाजांचाही समावेश आहे.
आयपीएल (IPL) 2022 काही दिवसांत सुरू होणार आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग मानली जाते, त्यामुळे सर्वांची नजर या लीगकडे असणार आहेत. दोन वर्षानंतर भारतात संपूर्णपणे या लीगचे आयोजन केले जाणार आहे, त्यामुळे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघाची जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाचे नाव सर्वात पाहिले येते. 2013 च्या मध्यात मुंबई इंडियन्सची कमान सांभाळ्यापासून कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील या फ्रँचायझीने आयपीएलमध्ये अनेक मोठे विक्रम प्रस्थापित केले आहे. या संघाला यशस्वी करण्यात कर्णधार रोहितसोबतच अनेक खेळाडूंचा मोलाचा वाटा राहील आहे, ज्यांनी आपल्या खेळाने या संघाला 5 वेळा आयपीएलचा चॅम्पियन मान मिळवून दिला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्ससाठी फक्त 4 फलंदाजांनी शतक झळकावले आहे. या यादीत 2 भारतीय तर दोन विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. (Mumbai Indians IPL 2022 Full Schedule: रोहित शर्माची ‘पलटन’ पहिल्या सामन्यात ऋषभ पंतच्या दिल्लीशी भिडणार, या मैदानावर खेळणार सर्वाधिक सामने)
सनथ जयसूर्या
आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्ससाठी शतक झळकावणारा श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या पहिला फलंदाज होता. आयपीएलच्या पहिल्याच हंगामात जयसूर्याने मुंबई इंडियन्ससाठी शतक झळकावले होते. 2008 मध्ये जयसूर्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकले होते आणि सामन्यात नाबाद 114 धावांची खेळी केली. जयसूर्या आयपीएलमधील या संघाचा पहिला शतकवीर होता.
सचिन तेंडुलकर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्ससाठी दुसरे शतक झळकावण्याचा पराक्रम केला. सचिनने आयपीएल 2011 मध्ये कोची टस्कर्स केरळ विरुद्ध 66 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. उल्लेखनीय आहे की सचिनच्या शतकी खेळीनंतरही मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
रोहित शर्मा
मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माने देखील आपल्या फ्रँचायझीसाठी शतक झळकावले आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 2012 मध्ये रोहितने शतक झळकावले होते. रोहितने 60 चेंडूत नाबाद 109 धावा करून नाबाद परतला होता. उल्लेखनीय आहे की आयपीएलमधील रोहितचे आतापर्यंतचेहे एकमेव शतक आहे.
लेंडल सिमन्स
वेस्ट इंडिजचा तडाखेबाज माजी सलामीवीर सिमन्स मुंबई इंडियन्ससाठी शतक झळकावणारा चौथा फलंदाज आहे. सिमन्सने 2014 मध्ये मुंबईसाठी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध शतकी पल्ला गाठला होता. सिमन्सने पंजाबविरुद्ध धावांचा पाठलाग करताना 61 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. पंजाबविरुद्ध 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सिमन्सने 14 चौकार आणि 2 षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.