ICC Cricket World Cup 2023: वर्ल्ड कप नंतर हे 3 भारतीय खेळाडू घेवु शकतात रिटायरमेंट, तर 'या' दोन खेळाडूंसाठी संघात परतणे कठीण

म्हणजेच दिग्गज खेळाडूंचे जाणे आणि तरुणांचे आगमन असा क्रम सुरू झाला होता, तो आता या वेळीही पाहायला मिळेल. आगामी स्पर्धा भारताच्या सध्याच्या अनेक दिग्गजांसाठी टर्निंग पॉइंट ठरू शकते.

Team India (Photo Credit - Twitter)

एकदिवसीय विश्वचषक 2023 या (ODI World Cup 2023) वर्षी भारतात होणारा अनेक अर्थांनी खास असणार आहे. 2011 च्या विश्वचषकाच्या विजयानंतर टीम इंडियामध्ये जसे स्थित्यंतर सुरू झाले. म्हणजेच दिग्गज खेळाडूंचे जाणे आणि तरुणांचे आगमन असा क्रम सुरू झाला होता, तो आता या वेळीही पाहायला मिळेल. आगामी स्पर्धा भारताच्या सध्याच्या अनेक दिग्गजांसाठी टर्निंग पॉइंट ठरू शकते. कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) ही शेवटची स्पर्धा असण्याची दाट शक्यता आहे. त्याच वेळी, आणखी दोन खेळाडू आहेत जे या विश्वचषकानंतर निवृत्तीची घोषणा करू शकतात. (हे देखील वाचा: टिम इंडिया Asian Games 2023 खेळणार शिखर धवन याच्या नेतृत्वात, VVS Laxman प्रशिक्षकाच्या भूमिकेत)

रोहितच्या फिटनेस आणि फॉर्मवर बऱ्याच चर्चा

भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून विश्वचषकातील आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. त्याआधी संघाला आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकाही खेळायची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर टीम वेस्ट इंडिजचा महिनाभराचा दौरा करणार आहे. यामध्ये दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने या सर्व मालिका खास असणार आहेत. यामध्ये विशेषत: सर्वांच्या नजरा कॅप्टन रोहित शर्मावर असतील. रोहितच्या फिटनेस आणि फॉर्मवर बऱ्याच दिवसांपासून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्याला तो बॅटने उत्तर देऊ शकत नाही किंवा त्याच्या नेतृत्वाखाली संघाला कोणतेही विजेतेपद मिळवून देऊ शकत नाही.

रोहित शर्मासाठी ही शेवटची स्पर्धा असू शकते

रोहित शर्माचे वय 36 वर पोहोचले असून आता वाढत्या वयाचा परिणाम त्याच्या फलंदाजीच्या शैलीवरही दिसून येत आहे. रोहितचा हा तिसरा एकदिवसीय विश्वचषक असेल. यापूर्वी तो 2015 आणि 2019 मध्ये खेळला आहे आणि दोन्ही वेळेस त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. भारतीय संघ 2015 आणि 2019 या दोन्ही स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीत पोहोचला होता. रोहितने 2019 च्या विश्वचषकात 5 शतके झळकावून अप्रतिम कामगिरी केली. यावेळी सर्वांच्या नजरा रोहितवर असतील. मग तो कर्णधारही आहे त्यामुळे त्याच्यावर अधिक जबाबदारी असणार आहे. रोहितही या स्पर्धेनंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो.

या दोन खेळाडूंसाठी परतणे कठीण 

दुसरीकडे, रोहित शर्माशिवाय या यादीत शिखर धवन आणि रविचंद्रन अश्विन या दोन नावांचा समावेश केला जाऊ शकतो. अश्विनने 2010 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2011 मध्ये तो चॅम्पियन बनलेल्या भारतीय संघाचा देखील एक भाग होता. मात्र त्यानंतर तो केवळ 113 वनडे खेळला आहे. त्याचे वनडे संघातील स्थान बऱ्याच दिवसांपासून निश्चित झालेले नाही. अशा परिस्थितीत सप्टेंबरमध्ये 37 वर्षांचा होणारा अश्विन पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट सोडून कसोटी खेळणे सुरू ठेवू शकतो. अश्विनने 113 एकदिवसीय सामन्यांमध्ये 151 आणि 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 72 बळी घेतले आहेत. त्याने 2022 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला ज्यामध्ये त्याने पुनरागमन केले परंतु त्यानंतर तो पुन्हा बाहेर पडला.

करु शकतात निवृत्तीची घोषणा

शिखर धवनकडे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेश मालिकेपासून मैदानाबाहेर आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून त्याला एकाही मालिकेत संधी मिळाली नाही. यावेळी आयपीएलमध्येही त्याची बॅट काही खास दाखवू शकली नाही. आगामी वेस्ट इंडिज मालिकेसाठीही त्याच्या नावावर कोणतीही चर्चा झाली नाही. अशा स्थितीत आता त्याच्या वनडे संघात पुनरागमनाचा मार्ग खूपच कठीण दिसत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एकदिवसीय विश्वचषकानंतर तो निवृत्तीची घोषणाही करू शकतो. धवन आधीच टी-20 आणि कसोटी संघातून बाहेर होता. धवनने भारतासाठी 34 कसोटींमध्ये 2315 धावा, 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6793 धावा आणि 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1759 धावा केल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif