AUS vs SA WTC Final 2025 Live Streaming: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची लढत, भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण?

ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आहे, गेल्या आवृत्तीत त्यांनी भारताला हरवून विजेतेपद जिंकले होते. तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचली आहे. भारतीय चाहतेही या अंतिम फेरीची आतुरतेने वाट पाहत आहेत. सामना कधी आणि कोणत्या वेळी सुरू होईल ते आम्ही तुम्हाला सांगतो.

SA vs AUS (Photo Credit- X)

AUS vs SA WTC Final 2025 Live Streaming: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs SA) यांच्यात लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आहे, गेल्या आवृत्तीत त्यांनी भारताला हरवून विजेतेपद जिंकले होते. तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचली आहे. भारतीय चाहतेही या अंतिम फेरीची आतुरतेने वाट पाहत आहेत. सामना कधी आणि कोणत्या वेळी सुरू होईल ते आम्ही तुम्हाला सांगतो. भारतात डब्ल्यूटीसी फायनलचे थेट प्रक्षेपण कुठे होईल आणि कोणत्या अॅपवर लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. (हे देखील वाचा: जर WTC फायनल 2025 चा सामना अनिर्णित राहिला तर कोणाला मिळणार ट्रॉफी? कशी दिली जाणार बक्षीस रक्कम)

कशी होती दोन्ही संघाची कामगिरी?

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या चक्राबद्दल बोलायचे झाले तर, दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने एकूण 12 पैकी 8 सामने जिंकले. त्यांना 3 पराभव पत्करावा लागला आणि 1 सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाबद्दल बोलायचे झाले तर, या काळात त्यांनी एकूण 19 सामने खेळले. ऑस्ट्रेलियाने 13 सामने जिंकले आणि 4 पराभव पत्करावा लागला. 2 सामने अनिर्णित राहिले.

2025चा डब्ल्यूटीसी फायनल कधी आणि कुठे खेळला जाईल

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. या खेळपट्टीवर गोलंदाजांना खूप मदत होणार आहे, त्यामुळे जो संघ चांगली गोलंदाजी करेल तोच हा सामना जिंकेल. हा सामना 11 जून ते 15 जून दरम्यान खेळवला जाईल. यामध्ये एक दिवस (16 जून) राखीव दिवस म्हणून निश्चित करण्यात आला आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल.

भारतात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे थेट प्रक्षेपण कुठे केले जाईल?

आयसीसी डब्ल्यूटीसी फायनल 2025 स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर थेट प्रक्षेपण केले जाईल. सामन्याचे लाईव्ह स्टीमिंग जिओहॉटस्टार वेबसाइटवर असेल. मोबाइल वापरकर्ते जिओहॉटस्टार अॅपवर थेट सामन्याचा आनंद घेऊ शकतील.

दोन्ही संघाचे खेळाडू

दक्षिण आफ्रिका: टोनी डी झोर्झी, रायन रिकेल्टन, एडेन मार्कराम, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन, वियान मुल्डर, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, डेन पॅटरसन, केशव महाराज, सेनुरन मुथुसामी.

ऑस्ट्रेलिया: उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवुड, स्कॉट बोलंड, नॅथन लायन, मॅट कुह्नेमन.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

Alex Carey Australia Australia Announce WTC Final Squad australia national cricket team Australia squad for WTC final and West Indies tour Bavuma Beau Webster Bedingham BOSCH Cameron Green de Zorzi ICC World Test Championship 2025 ICC WTC Final 2025 ICC WTC Prize Money 2025 Jansen Josh Hazlewood Josh Inglis Maharaj Markram Marnus Labuschagne Matt Kuhnemann Mitchell Starc Mulder Muthusamy and Paterson. Nathan Lyon Ngidi Pat Cummins Rabada rickelton Sam Konstas Scott Boland south africa national cricket team South Africa vs Australia SOUTH AFRICA'S WTC FINAL SQUAD Steve Smith Stubbs TRAVIS HEAD Usman Khawaja Verreynne World Test Championship 2025 WTC Final 2025 WTC Prize Money आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप उस्मान ख्वाजा एनगिडी अ‍ॅलेक्स केरी ऑस्ट्रेलिया कॅमेरॉन ग्रीन जॅन्सन जोश इंग्लिस जोश हेझलवूड ट्रॅव्हिस हेड डी झोर्झी दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ नॅथन लिऑन पॅट कमिन्स बावुमा बेडिंगहॅम बॉश ब्यू वेबस्टर महाराज मार्कराम मार्नस लाबुशेन मिचेल स्टार्क मुथुसामी आणि पॅटरसन मुल्डर मॅट कुह्नेमन रबाडा रिकेल्टन व्हेरिन सॅम कॉन्स्टास स्कॉट बोलँड स्टब्स स्टीव्ह स्मिथ AUS vs SA WTC Final 2025 Live Streaming
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement