IND vs AUS 3rd Test: इंदूरच्या होळकर स्टेडियमवर कांगारू संघ येणार अडचणीत, टीम इंडियाच्या नावावर आहे शानदार रेकाॅर्ड

दुसरीकडे, जर टीम इंडियाने (Team India) तिसरी कसोटीही जिंकली तर ती जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम (WTC Final)साठी पात्र ठरेल तसेच मालिकाही आपल्या ताब्यात घेईल.

Team India (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा (Border-Gavaskar Trophy) तिसरा कसोटी सामना (IND vs AUS) इंदूर येथे खेळवला जाणार आहे. त्याचवेळी हा सामना होळकर स्टेडियमवर (Holkar Stadium) 1 ते 5 मार्च दरम्यान होणार आहे. सध्या भारत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन कसोटी सामने जिंकून 2-0 ने पुढे आहे. दुसरीकडे, जर टीम इंडियाने (Team India) तिसरी कसोटीही जिंकली तर ती जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम (WTC Final)साठी पात्र ठरेल तसेच मालिकाही आपल्या ताब्यात घेईल. सध्या होळकर स्टेडियमवर झालेल्या टीम इंडियाच्या रेकॉर्डबद्दल जाणून घ्या. (हे देखील वाचा: IND vs AUS 3rd Test: नवा उपकर्णधार निवडण्याची मोठी जबाबदारी रोहित शर्मावर, 'हे' तीन खेळाडू शर्यतीत आघाडीवर)

मात्र, इंदूरच्या होळकर स्टेडियमबद्दल बोलायचे झाले तर कसोटीत भारत हाच राजा आहे. या खेळपट्टीवर टीम इंडियाची कामगिरी अप्रतिम राहिली आहे आणि त्यामुळेच भारताने येथे एकही सामना गमावलेला नाही. वास्तविक, याआधी या मैदानावर दोनदा कसोटी मालिका खेळली गेली आहे. 2016 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध आणि 2019 मध्ये बांगलादेश विरुद्ध खेळले ज्यात भारताने विजय मिळवला.

आत्तापर्यंत होळकर स्टेडियमवर कसोटी स्वरूपाचे दोन सामने खेळले गेले आहेत. दोन्हीमध्ये भारताने बाजी मारली आहे. पहिला कसोटी सामना 8 ते 11 ऑक्टोबर 2016 दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध खेळला गेला ज्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. आणि नोव्हेंबर 2019 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. यादरम्यान, पहिल्या डावात भारताने एका विकेटवर 86 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात बांगलादेशचा 130 धावांनी पराभव झाला.

त्याचवेळी होळकर स्टेडियमवर विराट कोहलीने द्विशतक झळकावले आहे. तसेच, भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अजिंक्य रहाणेच्या नावावर आहे. 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 188 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. मात्र, यावेळी त्याला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. तर गोलंदाजीच्या बाबतीत भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.

टीम इंडिया कधीच झाली नाही ऑलआऊट 

अश्विन या स्टेडियममध्ये खूप जादू करतो. या स्टेडियमवर त्याने न्यूझीलंडविरुद्ध आपल्या गोलंदाजीने कहर केला आणि 13 विकेट्स घेण्यात यश मिळवले. तसेच, या स्टेडियममध्ये भारताची सर्वोत्तम धावसंख्या 557 धावा होती, जी भारताने न्यूझीलंडविरुद्ध केली होती. तसेच या मैदानावर भारतीय संघ कधीही ऑलआऊट झालेला नाही.