IND vs WI 1st Test 2023 Live Streaming: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली कसोटी मालिका आजपासून होणार सुरू, घरबसल्या कुठे पाहणार लाइव्ह घ्या जाणून

भारतात मोबाईल आणि टीव्ही दोन्हीवर हा सामना मोफत पाहता येणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​अंतर्गत खेळवली जाणारी पहिली मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series 2023) पहिला सामना बुधवारपासून खेळवला जात आहे. वेस्ट इंडिजमधील डॉमिनिका (Dominica) येथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल. भारतात मोबाईल आणि टीव्ही दोन्हीवर हा सामना मोफत पाहता येणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​अंतर्गत खेळवली जाणारी पहिली मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. या मालिकेत जिथे भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर येत आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजही विश्वचषक पात्रता फेरीतून बाहेर होवून मैदानात उतरणार आहे.

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 24 कसोटी मालिका खेळल्या गेल्या 

इतिहासाची पाने उलटली तर वेस्ट इंडिज संघाने कसोटीत आपली ताकद दाखवून दिली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी मालिका 1948 मध्ये खेळली गेली होती. पाच सामन्यांची मालिका वेस्ट इंडिजने 1-0 ने जिंकली. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 24 कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. टीम इंडियाने 10 वेळा, तर वेस्ट इंडिजने 12 वेळा भारताचा पराभव केला. तिथे 2 वेळा कसोटी मालिका अनिर्णित राहिली.

कधी आणि कुठे पाहणार लाइव्ह?

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान खेळली जाणारी मालिका फक्त डीडी स्पोर्ट्स चॅनलवर टीव्हीवर विनामूल्य पाहता येईल. तसेच मोबाईलवर जिओ सिनेमा अॅपवर पाहता येईल. हे देखील विनामूल्य आहे. (हे देखील वाचा: Asia Cup 2023: भारत पाकिस्तानला जाणार नाही, भारत-पाक सामना श्रीलंकेत होणार)

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, आर. मो. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.