How To Watch IPL 2024 Live Streaming: आयपीएलच्या 17व्या हंगामाला 22 मार्चपासून होणार सुरुवात, पहिल्या सामन्यात CSK vs RCB आमने-सामने; येथे पाहा लाइव्ह
अंतिम सामन्यात सीएसकेने गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. मात्र यावेळी गेल्या हंगामातील अंतिम फेरीतील संघांमध्ये पहिला सामना होत नाही.
CSK vs RCB IPL 2024: इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामाची (IPL 2024) सुरुवात 22 मार्चपासून चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (CSK vs RCB) यांच्यातील सामन्याने होणार आहे. आगामी हंगामात, मुंबई इंडियन्स आपल्या मोहिमेची सुरुवात 24 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्याने करेल. यावेळी मुंबई इंडियन्सची कमान हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) असेल, तर रोहित शर्मा (Rohit Sharma) फलंदाज म्हणून संघाचा भाग असेल. कर्णधारपदाच्या दडपणाशिवाय रोहित शर्मा आगामी मोसमात बॅटने कहर करू शकतो. चेन्नई सुपर किंग्ज गेल्या मोसमाचा विजेता आहे. अंतिम सामन्यात सीएसकेने गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. मात्र यावेळी गेल्या हंगामातील अंतिम फेरीतील संघांमध्ये पहिला सामना होत नाही. चाहत्यांना या स्पर्धेतील सर्व सामन्यांचा मोफत आनंद घेता येणार आहे. यासाठी चाहत्यांना फक्त इंटरनेट आणि स्मार्टफोनची आवश्यकता असेल.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
वास्तविक, यावेळीही आयपीएलचे सर्व सामने जिओ सिनेमावर दाखवले जाणार आहेत. जिओ सिनेमा यासाठी चाहत्यांकडून एक रुपयाही आकारणार नाही. चाहत्यांना सर्व सामने विनामूल्य ऑनलाइन पाहता येणार आहेत. जिओ सिनेमाने याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. या मोसमातील पहिला सामना एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्यात होणार आहे. त्यामुळे थरार द्विगुणित होईल. सीएसके आणि आरसीबी पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. (हे देखील वाचा: MS Dhoni Record: एमएस धोनीच्या नावावर आयपीएलच्या इतिहासात अनोखा विक्रम, जाणून घ्या अधिक माहिती)
चाहत्यांना आयपीएलचे सामने टीव्हीवर बघायचे असतील तर ते स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील. आयपीएल समालोचन हिंदी, इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असेल. मागच्या वेळी जिओ सिनेमाने चाहत्यांना भोजपुरी, तमिळ आणि तेलगू भाषेतही कॉमेंट्रीचा पर्याय दिला होता. हा पर्याय या हंगामातही सुरू राहणार आहे. चाहत्यांना सामान्य स्क्रीनवर तसेच एचडीमध्येही आयपीएलचा आनंद घेता येणार आहे.
देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलच्या केवळ 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पहिला सामना 22 मार्च रोजी सीएसके आणि आरसीबी यांच्यात होणार आहे. यानंतर दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल. दोन्ही संघांमधील हा सामना 23 मार्च रोजी चंदीगड येथे होणार आहे. आगामी हंगामातील तिसरा सामना केकेआर आणि सनराईज हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन येथे होणार आहे.