WTC Final 2023: टीम इंडियासोबत इंग्लंडला जाणार 'स्पेशल 4', आयपीएलमध्ये घालात आहे थैमान
7 जूनपासून इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यासाठी अजिंक्य रहाणे दीर्घ (Ajinkya Rahane) कालावधीनंतर टीम इंडियात (Team India) परतला आहे. यासोबतच 'स्पेशल 4' देखील भारतीय संघासोबत जाणार असल्याची बातमी आहे. वास्तविक, आयपीएलमध्ये थैमान घालणाऱ्या चार गोलंदाजांचा नेट गोलंदाज म्हणून समावेश करण्यात येणार आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC WTC Final 2023) मेगा मॅचसाठी मंगळवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. 7 जूनपासून इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यासाठी अजिंक्य रहाणे दीर्घ (Ajinkya Rahane) कालावधीनंतर टीम इंडियात (Team India) परतला आहे. यासोबतच 'स्पेशल 4' देखील भारतीय संघासोबत जाणार असल्याची बातमी आहे. वास्तविक, आयपीएलमध्ये थैमान घालणाऱ्या चार गोलंदाजांचा नेट गोलंदाज म्हणून समावेश करण्यात येणार आहे. इंग्लंडमधील खेळपट्टीची परिस्थिती पाहता निवड समितीने चार वेगवान गोलंदाजांना नेट गोलंदाज म्हणून इंग्लंडमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. (हे देखील वाचा: Ishan Kishan ने Shubman Gill ला मारली कानशिलात, Arjun Tendulkar ची प्रतिक्रिया होत आहे व्हायरल (Watch Video)
'या' वेगवान गोलंदाजांचा सामावेश
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, ज्या चार गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे त्यात मुकेश कुमार, उमरान मलिक, नवदीप सैनी आणि कुलदीप सेन यांच्या नावाचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू सध्या आयपीएलमध्ये आगपाखड करत आहेत. मुकेश सध्या दिल्ली कॅपिटल्सशी संबंधित आहे, तर उमरान मलिक सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. नवदीप सैनी आणि कुलदीप सेन राजस्थान रॉयल्सचा भाग आहेत. याआधीही हे चौघेही नेट गोलंदाज म्हणून संघात सामील झाले आहेत. सैनी आणि उमरान टीम इंडियाकडून खेळले आहेत.
टीम इंडियाला गेल्या वर्षी मिळाली निराशा
28 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. यानंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी तयारी करेल. काही खेळाडू अंतिम सामन्यापूर्वीच इंग्लंडला जाण्यास मोकळे असतील. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ प्रथमच कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. मागच्या वेळी टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध ट्रॉफी उचलण्यास मुकली होती. यावेळी सर्वांच्या नजरा विजेतेपदावर असतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)