IND vs NZ 3rd ODI: टीम इंडियाचे दोन मोठे मॅच विजेते तिसऱ्या वनडेतून होवू शकतात बाहेर! जाणून घ्या रोहित शर्मा कोणाला देणार संधी
त्याचे संकेत कर्णधार रोहित शर्माने रायपूर वनडेनंतर सादरीकरण सोहळ्यात दिले.
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकली आहे. आता टीम इंडिया 24 जानेवारीला इंदूरमध्ये तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. येथे रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मेन इन ब्लू क्लीन स्वीपकडे लक्ष देईल. तत्पूर्वी, संघाने श्रीलंकेविरुद्ध 3-0 असा क्लीन स्वीप केला होता. पण वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल बोलायचं झालं तर, खेळाडूंच्या फिटनेसला लक्षात घेऊन टीम इंडिया तिसऱ्या वनडेत काही बदल करू शकते. त्याचे संकेत कर्णधार रोहित शर्माने रायपूर वनडेनंतर सादरीकरण सोहळ्यात दिले. ऑस्ट्रेलियाविरुद्धची आगामी कसोटी मालिका (बॉर्डर गावस्कर ट्रॉफी) लक्षात घेऊन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्यावरील वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेऊन कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, इंदूरमध्ये (तिसरी वनडे) काय रणनीती असेल माहीत नाही.
संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. शमी आणि सिराज सतत दीर्घ स्पेल करत आहेत. मी त्यांना आगामी कसोटी मालिकेची आठवणही करून दिली आहे. म्हणून आपण त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे शमी आणि सिराज यांनी 10 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत सलग 5 वनडे सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत 24 जानेवारीला कर्णधार रोहित शर्मा कोणताही बदल करू शकतो. (हे देखील वाचा: KL Rahul-Athiya Shetty Wedding: केएल राहुल आणि अथिया शेट्टी उद्या अडकणार विवाहबंधनात! जाणून घ्या लग्नाशी संबंधित सर्व तपशील)
काय होतील बदल ?
विशेष म्हणजे सिराज आणि शमीशिवाय हार्दिक पांड्याचा फिटनेसही टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. श्रीलंका मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर हार्दिकला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. त्याच वेळी, त्याला 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत संघाचे नेतृत्व करायचे आहे. या स्थितीत कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या वनडेत हार्दिक पांड्याऐवजी शाहबाज अहमदला खेळवू शकतो. दुसरीकडे, उमरान मलिक शमी किंवा सिराज यापैकी एकाला विश्रांती देऊन जागा मिळवू शकतो. यामध्ये शमीला त्याचे वय पाहता विश्रांती घेण्याची अधिक संधी आहे. सिराज अजूनही तरुण असताना तिसर्या एकदिवसीय सामन्यात तो वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करु शकतो.
पुढील सामन्यासाठी टीम इंडियाचे संभाव्य प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.