T20 World Cup Schedule 2024: अंतिम फेरीत पोहोचल्यास टीम इंडिया नऊ सामने खेळेल, पाहा टी-20 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक
17 वर्षे उलटली, पण संघाला एकदाही टी-20 विश्वचषक जिंकता आले नाही. मात्र, भारतीय संघाने 2014 मध्ये अंतिम फेरीत आणि 2016-2022 मध्ये उपांत्य फेरी गाठली होती, मात्र त्यांना विजेतेपद मिळवता आले नव्हते.
T20 World Cup Schedule 2024: आता टी-20 विश्वचषक 2024 सुरू (T20 World Cup 2024) होण्यासाठी काही वेळ शिल्लक आहे. यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतील नऊ ठिकाणी टी-20 विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजचे सहा तर अमेरिकेचे तीन स्थान आहेत. इंग्लंड संघ गतविजेता आहे. 2022 मध्ये पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. भारतीय संघ दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याकडे डोळे लावून बसला आहे. टीम इंडियाने 2007 मध्ये उद्घाटनाच्या आवृत्तीत हे विजेतेपद पटकावले होते. 17 वर्षे उलटली, पण संघाला एकदाही टी-20 विश्वचषक जिंकता आले नाही. मात्र, भारतीय संघाने 2014 मध्ये अंतिम फेरीत आणि 2016-2022 मध्ये उपांत्य फेरी गाठली होती, मात्र त्यांना विजेतेपद मिळवता आले नव्हते. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून खूप अपेक्षा आहेत.
आत्तापर्यंतचा सर्वात मोठा टी-20 विश्वचषक
वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा टी-20 विश्वचषक म्हटले जात आहे. यामध्ये एकूण 20 संघ सहभागी होत आहेत. सर्व संघांची प्रत्येकी पाच संघांच्या चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताला अ गटात पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि यूएसए सोबत ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेतील पहिला सामना कॅनडा आणि अमेरिका यांच्यात 1 जून रोजी होणार आहे. तर, अंतिम सामना 29 जून रोजी बार्बाडोसच्या मैदानावर होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडशी होणार आहे. तर भारत पाकिस्तान सामना 9 जून रोजी होणार आहे. भारताचा तिसरा सामना 12 जूनला अमेरिकेसोबत आणि चौथा सामना 15 जूनला कॅनडाशी होईल.
ही स्पर्धा तीन टप्प्यात होणार आहे
लीग स्टेज: 1 ते 18 जून दरम्यान खेळला जाईल. प्रत्येक गटातील संघ आपापसात एक एक सामना खेळतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतील.
सुपर-8: 19-24 जून दरम्यान खेळवला जाईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ येथे सहभागी होतील. एकूण आठ संघ प्रत्येकी एक सामना खेळणार आहेत. येथून अव्वल चार संघ बाद फेरीत पोहोचतील.
नॉकआऊट: जे सुपर-8 मध्ये चांगली कामगिरी दाखवतील ते उपांत्य फेरीत प्रवेश करतील. पहिला उपांत्य फेरीचा सामना 26 जूनला तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना 27 जूनला होणार आहे. यानंतर उपांत्य फेरीतील दोन्ही विजेत्यांमध्ये 29 जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल.