IND W vs ENG W T20I Live Streaming: टीम इंडिया 28 जूनला खेळेल पहिला टी-20 सामना, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे पाहाल सामन्याचे थेट प्रसारण

28 जून 2024 पासून भारतीय महिला संघ इंग्लंड महिला संघाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका 2026 मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खूप महत्त्वाची मानली जात आहे.

IND W vs ENG W (Photo Credit- X)

India Women vs England Women T20 2024: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे 28 जून 2024 पासून इंग्लंड महिला संघाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका 2026 मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खूप महत्त्वाची मानली जात आहे. या दौऱ्यात भारत 5 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG T20I Series: इंग्लंड दौऱ्यावर भारत खेळणार 5 टी-20 सामन्यांची मालिका, 'या' खेळाडूंना मिळाली संधी; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक)

पहिला सामना नॉटिंगहॅम येथे

टी-20 मालिकेतील पहिला सामना 28 जून रोजी ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम येथे खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. उर्वरित चार टी-20 सामने रात्री 11 वाजता खेळवले जातील.

कुठे पाहाल सामन्यांचे थेट प्रक्षेपण?

भारत आणि इंग्लंड महिला संघातील सर्व टी-20 सामने भारतात Sony Sports Network च्या विविध चॅनेल्सवर थेट प्रसारित केले जातील. तसेच, SonyLIV अॅपवर ऑनलाइन स्ट्रीमिंग उपलब्ध असेल, जिथे प्रेक्षक मोबाइलवर लॉग इन करून थेट सामना पाहू शकतात.

टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, हरलीन देओल, सायली सातघरे, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, राधा यादव, श्री चारानी.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement