IND vs IRE 2nd T20 Live Streaming: टीम इंडिया आयर्लंडविरुद्ध मालिका काबीज करण्यासाठी उतरणार मैदानात, जाणून घ्या कधी, कुठे पाहणार सामना
या सामन्यात प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणारा भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) चमकदार कामगिरी करत विरोधी संघाची अवस्था बिघडवली होती.
भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी खेळवला जाणार आहे. हा सामना आयर्लंडमधील डब्लिन येथील द व्हिलेज मैदानावर होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने चांगली कामगिरी करत डीएलस अंतर्गत 2 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणारा भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) चमकदार कामगिरी करत विरोधी संघाची अवस्था बिघडवली होती. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडचा संघ केवळ 139 धावा करू शकला. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिकेवर कब्जा करायचा आहे. त्याचवेळी आयर्लंड पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरेल.
कधी-कुठे पाहणार सामना?
भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी खेळवला जाणार आहे. हा सामना आयर्लंडमधील डब्लिन येथील द व्हिलेज मैदानावर होणार आहे. हा सामना तुम्हाला जिओ सिनेमा मोबाईलवर पाहता येईल. तसेच स्पोर्ट्स 18 वर टीव्हीवर पाहता येईल.
कोण कोणावर भारी?
भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 विक्रमांवर नजर टाकली तर यामध्ये टीम इंडियाचा वरचष्मा आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत 6 टी-20 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी फक्त भारतीय संघ जिंकला आहे. अशा स्थितीत, जिथे टीम इंडियाला आपला विक्रम आणखी मजबूत करायचा आहे, तिथे आयर्लंडचा भारताविरुद्धचा पहिला सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल.
भारताचे संभाव्य प्लेइंग 11: यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), आणि रवी बिश्नोई.
आयर्लंडचे संभाव्य प्लेइंग 11: आंद्रे बालबिर्नी, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), लॉर्कन टकर (विकेटकीप), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क एडेअर, बी मॅककार्थी, क्रेग यंग, बी व्हाईट आणि जोशुआ लिटल.