IND vs SL, Kho Kho World Cup 2025 Live Streaming: खो-खो विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना श्रीलंकेशी, येथे जाणून घ्या थेट प्रक्षेपण कधी अन् कुठे पाहणार
प्रतीक वायकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुढील क्वार्टर फायनल सामन्यात श्रीलंकेचा सामना करेल. नेपाळविरुद्धच्या एका चुरशीच्या सामन्यात भारताने 42-37 असा विजय मिळवला. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारताने ब्राझील, पेरू आणि भूतान यांना अनुक्रमे 64-34, 70-38 आणि 71-34 असे हरवून त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना धक्का दिला.
India vs Sri Lanka Kho Kho World Cup 2025 Live Telecast: भारतात होणाऱ्या पहिल्या खो-खो विश्वचषक 2025 मध्ये भारतीय राष्ट्रीय खो-खो संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. गट अ मध्ये, भारताने सर्व साखळी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आणि कोणताही पराभव न होता प्लेऑफसाठी पात्र ठरला. प्रतीक वायकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुढील क्वार्टर फायनल सामन्यात श्रीलंकेचा सामना करेल. नेपाळविरुद्धच्या एका चुरशीच्या सामन्यात भारताने 42-37 असा विजय मिळवला. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारताने ब्राझील, पेरू आणि भूतान यांना अनुक्रमे 64-34, 70-38 आणि 71-34 असे हरवून त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना धक्का दिला. श्रीलंकेने तीन विजय आणि एका पराभवासह गट क मधून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
कधी अन् कुठे खेळवला जाणार सामना?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील खो-खो विश्वचषक 2025 चा उपांत्यपूर्व सामना 17 जानेवारी रोजी खेळला जाईल. हा सामना दिल्लीतील आयजीआय स्टेडियमवर होणार आहे आणि भारतीय वेळेनुसार रात्री 8.15 वाजता सुरू होईल. (हे देखील वाचा: FIFA विश्वचषकापूर्वी मोरोक्कोमध्ये 30,000 भटक्या कुत्र्यांना मारले जाणार का? कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का)
भारत विरुद्ध श्रीलंका, खो-खो विश्वचषक 2025 चे लाईव्ह प्रक्षेपण कुठे पाहणार?
2025 च्या खो-खो विश्वचषकासाठी स्टार स्पोर्ट्स हा भारतातील अधिकृत प्रसारण भागीदार आहे. भारतातील चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवरून या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात.
भारत विरुद्ध श्रीलंका, खो-खो विश्वचषक 2025चे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहणार?
खो-खो विश्वचषक2025 चे लाईव्ह स्ट्रीमिंग स्टार नेटवर्कच्या अधिकृत ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने+ हॉटस्टारवर उपलब्ध असेल. भारतातील ज्या चाहत्यांना ऑनलाइन पाहण्याची आवड आहे ते डिस्ने+ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात परंतु त्यासाठी सबस्क्रिप्शन आवश्यक असेल. डीडी स्पोर्ट्स डीडी डिश वापरकर्त्यांसाठी लाईव्ह ऑनलाइन स्ट्रीमिंग पर्याय देखील प्रदान करेल.