IND vs ENG 3rd ODI Records: अहमदाबादमध्ये मोठ्या विजयासह टीम इंडियाने रचली विक्रमांची मालिका, किंग कोहली बनला नंबर वन फलंदाज तर गिलने जिंकले 'दिल'
भारतीय संघाने मालिका 3-0 अशी जिंकली. फलंदाजीत, शुभमन गिलने (Shubman Gill) त्याच्या शतकाने सर्वांचे मन जिंकले, तर किंग कोहली (Virat Kohli) देखील अखेर फॉर्ममध्ये परतला. गोलंदाजांनीही त्यांचे काम चोख बजावले आणि संपूर्ण इंग्लंड संघाला फक्त 214 धावांत गुंडाळले.
अहमदाबाद: तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाने (Team India) इंग्रजांना क्लीन स्वीप केले. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितच्या संघाने इंग्लंडला 142 धावांनी (India Beat England) हरवले. या विजयासह भारतीय संघाने मालिका 3-0 अशी जिंकली. फलंदाजीत, शुभमन गिलने (Shubman Gill) त्याच्या शतकाने सर्वांचे मन जिंकले, तर किंग कोहली (Virat Kohli) देखील अखेर फॉर्ममध्ये परतला. गोलंदाजांनीही त्यांचे काम चोख बजावले आणि संपूर्ण इंग्लंड संघाला फक्त 214 धावांत गुंडाळले. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमने (Narendra Modi Cricket Stadium, Ahmedabad) कोणते मोठे विक्रम झाले ते आपण पाहूया...
कोहली फाॅर्ममध्ये परतला
विराट कोहलीने 55 चेंडूंचा सामना करत 52 धावांची दमदार खेळी केली. या खेळीसह किंग कोहलीने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये तीन वेगवेगळ्या देशांविरुद्ध खेळताना 4 हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा विराट पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. इंग्लंडविरुद्ध त्याच्या नावावर आता 4076 धावा आहेत. यासह, कोहलीने आशियामध्ये खेळताना तिन्ही फॉरमॅटमध्ये 16 हजार धावा पूर्ण केल्या.
हा टप्पा गाठण्यासाठी त्याने सर्वात कमी डाव खेळले. एवढेच नाही तर कोहली इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाजही बनला आहे. इंग्लिश संघाविरुद्ध खेळताना त्याने आतापर्यंत 87 सामन्यांमध्ये 4036 धावा केल्या आहेत. (हे देखील वाचा: Virat Kohli Record: विराट कोहलीची मोठी कामगिरी; इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 हजार धावा करणारा ठरला पहिला भरातीय खेळाडू)
गिलने मने जिंकली
शुभमन गिलने अहमदाबादमध्ये शानदार कामगिरी केली आणि 102 चेंडूत 112 धावांची संस्मरणीय खेळी केली. या शतकासह, गिलने 2022 नंतर सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत जो रूटची बरोबरी केली आहे. 2022 पासून त्याने 13 शतके ठोकली आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 डाव खेळल्यानंतर शुभमन सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. गिलने 60 च्या सरासरीने 2,587 धावा केल्या आहेत. या बाबतीत त्याने हाशिम आमलाला मागे टाकले आहे.
अहमदाबादमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने स्कोअरबोर्डवर 356 धावा केल्या, जो अहमदाबादच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च धावसंख्या आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नावावर असलेल्या सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडण्यापासून भारतीय फलंदाज फक्त 10 धावा कमी पडल्या. 2020 मध्ये आफ्रिकेने याच मैदानावर 365 धावा केल्या होत्या.
टीम इंडियाचा दुसरा सर्वात मोठा विजय
धावफलकावर 356 धावा टाकल्यानंतर, रोहितच्या पलटनने इंग्लिश संघाला फक्त 214 धावांवर गुंडाळले आणि 142 धावांनी सामना जिंकला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. याआधी 2008 मध्ये टीम इंडियाने ब्रिटीशांना 158 धावांनी पराभूत केले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)