India Squad For 2nd Test Kanpur: चेन्नईतील विजयानंतर लगेचच दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळाली संधी

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी कसोटी 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे.

Team India (Photo Credit - X)

IND vs BAN 2nd Test 2024: भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत 280 धावांनी विजय (IND Beat BAN 1st Test) मिळवला. या सामन्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी बीसीसआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने दुसऱ्या कसोटीत कोणताही बदल केलेला नाही. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी कसोटी 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पहिल्या सामन्यानंतर विश्रांती दिली जाईल, अशी अटकळ होती, मात्र तसे झाले नाही.

दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

हे देखील वाचा: WTC 2023-25 Points Table: डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये टीम इंडियाला बंपर फायदा, बांगलादेशला 440 व्होल्टचा झटका

भारताने पहिली कसोटी 280 धावांनी जिंकली

चेन्नईत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने चौथ्या दिवशी 280 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम खेळून भारताने अश्विनच्या शानदार शतकाच्या जोरावर पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ पहिल्या डावात केवळ 149 धावाच करू शकला. यानंतर दुसऱ्या डावात भारताकडून शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी शतके झळकावली. भारताने 287 धावांवर डाव घोषित केला आणि बांगलादेशला 515 धावांचे मोठे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात पाहुण्या संघाचा डाव 234 धावांवर आटोपला. अश्विनने दुसऱ्या डावातही भारताकडून 6 बळी घेतले. चौथ्यांदा त्याने एका कसोटीत शतक आणि पाच बळी घेतले.