T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका, दुखापतीमुळे शोएब मकसूद संघाबाहेर; 'या' खेळाडूला मिळाली संधी

कारण, त्याने या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली होती, असे पाकिस्तान संघातील मुख्य निवडकर्ता मोहम्मद वसीम म्हणाले आहेत.

पाकिस्तानी क्रिकेट टीम (Photo Credits: Getty Images)

यूएई आणि ओमानशमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी 20 विश्वचषक 2021 च्या (T20 World Cup 2021) आधीच पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा तडाखेबाज फलंदाज शोएब मकसूद (Sohaib Maqsood) संघाबाहेर गेला आहे. त्याच्या जागेवर अनुभवी फलंदाज शोएब मलिकला (Shoaib Malik) संघात स्थान देण्यात आले आहे. शोएब मकसूदच्या पाठीला दुखापत झाल्याने त्याला संघातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्याने शोएब मकसूद निराश झाला आहे. कारण, त्याने या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली होती, असे पाकिस्तान संघातील मुख्य निवडकर्ता मोहम्मद वसीम म्हणाले आहेत.

शोएब मकसूदच्या पाठीला 6 ऑक्टोबर रोजी दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला सेंट्रल पंजाबविरोधात सामना खेळता आला नाही. त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी शोएबच्या पाठीचा एमआरआय स्कॅन करण्यात आला होता. 'टीम मॅनेजमेंटशी बोलल्यानंतर आम्ही त्याच्या जागेवर शोएब मलिकचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला. शोएब मलिक अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या अनुभवाचा संघाला नक्कीच फायदा होईल, असेही मोहम्मद वसीम यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- AUS (W) Vs IND (W), 2nd T20I: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 4 विकेट्सने पराभव

ट्वीट- 

 

पाकिस्तान टी-20 विश्वचषक 2021 संघ-

बाबर आजम (कप्तान), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रऊफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीज़, मोहम्मद नवाज़, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, सरफराज अहमद, शाहीन शाह अफरीदी, शोएब मलिक.

शोएब मलिक हा अनुभवी खेळाडू आहे. त्याने 2007 साली पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्व केले होते. तर 2009 मध्ये पाकिस्तानच्या संघाने टी-20 विश्वचषक जिंकला होता, त्या संघाचा तो सदस्य होता.



संबंधित बातम्या