T20 World Cup 2021: रवी शास्त्रींच्या ‘या’ मतांचे पाकिस्तान कर्णधार Babar Azam कडून समर्थन, म्हणाला- 'हे खरोखर सोपे नाही’
नामिबिया विरुद्ध भारत आयसीसी टी-20 विश्वचषक सामन्यापूर्वी शास्त्री म्हणाले की सहा महिने बायो-बबलमध्ये राहिल्यानंतर त्यांचे खेळाडू मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकले होते.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) कर्णधार बाबर आजमने (Babar Azam) भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या मातांना पाठिंबा दिलासा असून खेळाडूंना सतत बायो-बबलमध्ये खेळणे सोपे नसते, असे म्हटले आहे. नामिबिया (Namibia) विरुद्ध भारत आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) सामन्यापूर्वी शास्त्री म्हणाले की सहा महिने बायो-बबलमध्ये राहिल्यानंतर त्यांचे खेळाडू मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकले होते आणि आयपीएल व ICC स्पर्धांमधील विश्रांतीचा त्यांच्या संघाला फायदा झाला असता. 2012 नंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यात टीम इंडिया (Team India) अपयशी ठरलीय आहे. “व्यावसायिक क्रिकेटमध्ये नेहमीच चढ-उतार असतात परंतु हो! खेळाडू सतत बायो-बबल वातावरणात राहून त्रस्त आणि अस्वस्थ होतात,” बाबरने गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या संघाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले. (Ravi Shastri यांचा ‘महान संघांपैकी एक’ टीम इंडियाला निरोप, विदाई सामन्यापूर्वी पहा काय म्हणाले)
“आम्ही एक गट म्हणून काम करण्याचा आणि पाकिस्तान संघात एकमेकांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे,” तो म्हणाला. पाकिस्तान कर्णधाराने सांगितले की, गेल्या वर्षभरापासून खेळाडूंना सतत बंदिस्त वातावरणात राहणे सोपे नव्हते. कोविड-19 महामारीच्या सक्तीने व्यत्यय आणला तेव्हापासून बायो-बबल एक सर्वसामान्य प्रमाण बनले आहे. “खेळाडू म्हणून तुम्हाला आराम करण्याची आणि दबाव आत्मसात करण्यासाठी तयार असण्याची गरज आहे. पण जेव्हा काही ठीक होत नाही तेव्हा तुम्हाला जागेची गरज असते आणि तुम्हाला ताजेतवाने होण्याची, बाहेर जाण्याची गरज असते. जर तुम्ही बबलमधून बाहेर पडू शकत नसाल, तर नकारात्मक विचार तुमच्या मनात प्रवेश करतात आणि तुमच्या कामगिरीवर परिणाम करतात,” त्याने स्पष्ट केले.
दुसरीकडे, बाबर म्हणाला की संघाने सुपर-12 गटातील पाच सामने जिंकण्यासाठी केलेल्या मेहनतीची आणि प्रयत्नांची कसोटी आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीत घेतली जाईल. स्टार फलंदाजाने सांगितले की संघाला यश मिळवून देण्यासाठी तो कठोर निर्णय घेण्यास प्रतिकूल नाही. बाबरने मेगा इव्हेंटमध्ये पाकिस्तानचे यशाचे श्रेय संघातील 8-9 खेळाडूंना दिले जे गेल्या तीन-चार वर्षांपासून एकत्र आहेत आणि एकमेकांना चांगले ओळखत आहेत. “प्रत्येकजण जबाबदारी घेतो, प्रत्येकाची भूमिका स्पष्ट आहे. उपांत्य फेरीत आम्हाला सकारात्मकतेने पुढे जायचे आहे, परंतु त्या दिवशी तुम्ही कशी कामगिरी करता यावर अवलंबून आहे.”