T20 WC 2021, PAK vs NZ: टिम साऊदीने उडवला Babar Azam याचा त्रिफळा, पाकिस्तान कर्णधाराचा अडथळा दूर करत एलिट टी-20 क्लबमध्ये घेतली एन्ट्री

यासह किवी वेगवान गोलंदाज साऊदीने पाकिस्तान कर्णधाराच्या वरचढ ठरून एलिट यादीत आपले नाव नोंदवले आहे.

बाबर आजम (Photo Credit: PTI)

शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) मंगळवारी नुकत्याच संपुष्टात आलेल्या आयसीसी वर्ल्ड टी-20 (ICC T20 World Cup) 2021 मध्ये न्यूझीलंड (New Zealand) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) मनोरंजक सामन्यात अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साऊदीला  (Tim Southee) पाकिस्तानी फलंदाज बाबर आजमची (Babar Azam) जॅकपॉट विकेट मिळाली. सर्व फॉरमॅटमधील खेळाच्या आधुनिक युगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक, वेगवान गोलंदाज साऊदीने पाकिस्तान कर्णधाराच्या वरचढ ठरून एलिट यादीत आपले नाव नोंदवले आहे. प्रसिद्ध शारजाह क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानच्या डावाच्या पाचव्या षटकात साऊदीने आझमला स्लोअर बॉल टाकत बाद केले. यासह किवी वेगवान गोलंदाजाने जागतिक क्रिकेटमध्ये वैयक्तिक मैलाचा दगड गाठला. शारजाह येथे कमी धावसंख्येच्या सामन्यात आजमची विकेट घेत साऊदीने 100 वी टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट मिळवली. (T20 World Cup 2021, PAK vs NZ: पाकिस्तानचा विजयरथ सुसाट, शोएब मलिक-असिफ अलीचा संयमी खेळ; सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडला 5 विकेटने लोळवलं)

न्यूझीलंडचा हा वरिष्ठ वेगवान गोलंदाज खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार आता श्रीलंकन दिग्गज खेळाडू लसिथ मलिंगा आणि बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन यांच्या या एलिट यादीत सामील झाला आहे. 32 वर्षीय साऊदने ब्लॅक कॅप्ससाठी 79 टेस्ट मॅच, 143 वनडे आंतरराष्ट्रीय आणि 83 टी-20 सामने खेळले आहेत. तसेच किवी आउटस्विंगरने ब्लॅक कॅप्ससाठी कसोटीत 314, एकदिवसीय सामन्यात 190 आणि टी-20 मध्ये 100 विकेट घेतल्या आहेत. न्यूझीलंड गोलंदाजाने 2008 मध्ये ईडन पार्क येथे माजी विश्वविजेत्या इंग्लंडविरुद्ध टी-20 मध्ये पदार्पण केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

पाकिस्तानविरुद्ध सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, किवी वेगवान गोलंदाजाने 25 धावा लुटल्या आणि शारजाह येथे आजमची विकेट मिळवली. 2009 टी-20 चॅम्पियन विरुद्ध पहिले फलंदाजी करताना केन विल्यमसनच्या किवी संघाने 20 षटकांत पाकिस्तानसमोर 135 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला. मात्र छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना अखेरीस शोएब मलिक व असिफ अलीच्या संयमी फलंदाजीने संघाला स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवून दिला. यासह संघ गट 2 च्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बाबर आजमच्या पाकिस्तानने सलग दोन सामने जिंकून 4 गुणांची कमाई केली आहे. आणि सेमीफायनल जागेसाठी आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे.