Syed Mushtaq Ali Trophy 2021: पंजाब टीमपुढे गतविजेत्या कर्नाटकने टेकले गुडघे, तामिळनाडूने सेमीफायनलमध्ये बुक केले स्थान

आपल्या गोलंदाजांनंतर फलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर तामिळनाडूने हिमाचल प्रदेशला पाच विकेट्सने पराभूत करत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दरम्यान, पहिल्या क्वार्टरफायनल सामन्यात पंजाबने गतविजेत्या कर्नाटकला बाहेरचा रस्ता दाखवला.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Syed Mushtaq Ali Trophy 2021: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) टी-20 स्पर्धेच्या सेमीफायनल फेरीत पंजाब आणि तामिळनाडू (Tamil Nadu) संघाने स्थान निश्चित केलं आहे. आपल्या गोलंदाजांनंतर फलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर तामिळनाडूने मंगळवारी मोटेरा येथील सरदार पटेल स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात हिमाचल प्रदेशला (Himachal Pradesh) पाच विकेट्सने पराभूत करत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसर्‍या क्वार्टर फायनलमध्ये पहिले फलंदाजी करत हिमाचलने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 135 धावा केल्या. कर्णधार ऋषी धवनने (Rishi Dhawan) नाबाद 35, अभिमन्यू राणाने 28 आणि नितीन राणाने 26 धावा केल्या. तामिळनाडूकडून सोनू यादवने 3 आणि संदीप वॉरियरने 2, सई किशोर आणि एम मोहम्मदने प्रत्येकी 1 गडी बाद केला. तामिळनाडूने हिमाचलकडून मिळाले 136 धावांचे लक्ष्य 17.5 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून गाठले. संघासाठी बाबा अपराजितने नाबाद 55, शाहरुख खानने नाबाद 40 आणि हरि श्रीनाथने 17 धावा केल्या. (Syed Mushtaq Ali Trophy 2021: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021 क्वार्टर-फायनलचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी आणि कोणत्या संघात होणार टक्कर)

दरम्यान, पहिल्या क्वार्टरफायनल सामन्यात पंजाबने (Punjab) गतविजेत्या कर्नाटकला (Karnataka) बाहेरचा रस्ता दाखवला. पंजाबने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि कर्नाटकला 17.2 ओव्हरमध्ये फक्त 87 धावांवर गुंडाळलं. कर्नाटककडून अनिरुद्ध जोशीने 34 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 27 धावा केल्या. आयपीएल स्टार देवदत्त पडिकल अवघ्या 11 धावाच करू शकला. पंजाबने 12.4 ओव्हरमध्ये 89 धावांचं लक्ष्य गाठलं. पंजाबकडून सिद्धार्थ कौलने 15 धावांवर सर्वाधिक तीन विकेट घेतल्या, तर संदीप शर्मा, अर्शदीप सिंह आणि रमनदीप सिंह यांनी प्रत्येकी 2 विकेट, तर मयंक मार्कंडेला 1 विकेट मिळाली. दरम्यान, पंजाबसाठी बॅटने सिमरनने 37 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या तर कर्णधार मनदीपने 55 चेंडूत नाबाद 35 धावांचे योगदान दिले.

दुसरीकडे, 27 जानेवारी म्हणजे आज तिसरा आणि चौथा क्वार्टर-फायनल सामना खेळला जाईल. यामध्ये हरियाणा-बरोदा आणि बिहार -राजस्थान संघात टक्कर होईल. हे दोन्ही सामानाने देखील अहमदबाद येथे आयोजित केले जाणार आहे.