SYT W vs PRS W 24th Match WBBL 2024 Live Streaming: सिडनी थंडर-पर्थ स्कॉचर्स यांच्यात खेळवला जाणार रोमांचक सामना; लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?

उभय संघांमधला हा सामना सिडनीतील ड्रममॉयन ओव्हलवर मैदानावर खेळवला जाणार आहे.

Photo Credit- X

Sydney Thunder Women vs Perth Scorchers Women, 24th Match Womens Big Bash 2024 Live Streaming: महिला बिग बॅश लीग 2024 मधील 24 वा सामना आज सिडनी थंडर विरुद्ध पर्थ स्कॉचर्स महिला संघ(Sydney Thunder Women vs Perth Scorchers Women) यांच्यात होणार आहे. उभय संघांमधला हा सामना सिडनीतील ड्रममॉयन ओव्हलवर खेळवला जाणार(Womens Big Bash 2024 Live Streaming) आहे. सिडनी थंडर महिला संघाने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 4 जिंकले आहेत आणि एकात पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय सिडनी थंडर संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पर्थ स्कॉचर्स महिला संघाने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 3 जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. पर्थ स्कॉचर्स महिला संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. (हेही वाचा:SYT W vs BRH W 16th Match WBBL 2024 Scorecard: सिडनी थंडरने ब्रिस्बेन हीटचा 19 धावांनी केला पराभव, सामंथा बेट्सने घेतल्या 4 विकेट )

दोन्ही संघांमध्ये हेड टू हेड रेकॉर्ड

सिडनी थंडर महिला विरुद्ध पर्थ स्कॉचर्स महिला संघात आतापर्यंत एकूण 20 वेळा सामने झाले आहेत. ज्यामध्ये सिडनी थंडर महिला संघाने 9 सामने जिंकले आहेत. तर पर्थ स्कॉचर्स महिलांनी 11 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ एकमेकांना जोरदार टक्कर देऊ शकतात हे स्पष्ट आहे.

सामना कधी खेळवला जाणार?

महिला बिग बॅश लीग 2024 मधील सिडनी थंडर महिला विरुद्ध पर्थ स्कॉचर्स महिला यांच्यातील 24 वा सामना आज, मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:40 वाजता ड्रममोयने ओव्हल, सिडनी येथे खेळला जाईल.

सामना कुठे पहाल?

महिला बिग बॅश लीग 2024 मधील सिडनी थंडर महिला विरुद्ध पर्थ स्कॉचर्स महिला यांच्यातील 24 वा सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. याशिवाय, तुम्ही Disney+ Hotstar ॲपवर लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.

दोन्ही संघांचे खेळाडू

सिडनी थंडर संघ: फोबी लिचफिल्ड (कर्णधार), ताहलिया विल्सन (विकेटकीपर), चामारी अथापथू, जॉर्जिया वॉल, हीदर नाइट, अनिका लिरॉयड, सॅमी-जो जॉन्सन, हन्ना डार्लिंग्टन, टॅनेल पेशेल, शबनीम इस्माईल, सामंथा बेट्स, एला ब्रिस, क्लेअर ब्रिस मूर

पर्थ स्कॉचर्स संघ: सोफी डेव्हाईन (कर्णधार), बेथ मूनी (विकेटकीपर), क्लो पिपारो, डेलन हेमलता, एमी जोन्स, मिकायला हिंकले, अलाना किंग, क्लो एन्सवर्थ, एमी लुईस एडगर, लिली मिल्स, एबोनी हॉस्किन, मॅडी डार्क, कार्ली लीसॉन



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif