SYT W vs BRH W 16th Match WBBL 2024 Scorecard: सिडनी थंडरने ब्रिस्बेन हीटचा 19 धावांनी केला पराभव, सामंथा बेट्सने घेतल्या 4 विकेट

171 धावांचा पाठलाग करताना नॉर्थ ब्रिस्बेन हीट महिला संघ 19.1 षटकात 151 धावांवर सर्वबाद झाला. ब्रिस्बेन हीट महिलांसाठी चार्ली नॉटने सर्वाधिक 55 धावा केल्या.

SYT W vs BRH W 16th Match WBBL 2024 Scorecard: सिडनी थंडरने ब्रिस्बेन हीटचा 19 धावांनी केला पराभव, सामंथा बेट्सने घेतल्या  4 विकेट

Sydney Thunder Women vs Brisbane Heat Women, 16th Match Womens Big Bash 2024 Scorecard:  महिला बिग बॅश लीग 2024 चा 16 वा सामना आज पर्थमधील W.A.C.A येथे सिडनी थंडर महिला विरुद्ध ब्रिस्बेन हीट महिला यांच्यात झाला. या सामन्यात सिडनी थंडर महिला संघाने ब्रिस्बेन हीट महिला संघाचा 19 धावांनी पराभव केला. यासह सिडनी थंडरने चार सामन्यांमध्ये तिसरा विजय नोंदवला आहे. सिडनी थंडरच्या या सामन्यात सामंथा बेट्सने 4 षटकात 25 धावा देत 4 बळी घेतले. याशिवाय हीदर नाइटनेही 34 चेंडूत 59 धावांची खेळी केली.  (हेही वाचा  -  PRS W vs MLR W 17th Match WBBL 2024 Toss Update: मेलबर्न रेनेगेड्सने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग XI )

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर सिडनी थंडर महिला संघाची सुरुवात चांगली झाली. सिडनी थंडर महिला संघाने पहिल्या 6 षटकात 49 धावा केल्या. यानंतर सिडनी थंडरची पहिली विकेट 52 धावांवर पडली. ब्रिस्बेन हीट महिला संघाची कर्णधार जेस जोनासेनने चामारी अथापट्टूला 33 धावांवर बाद करून सिडनी थंडरला पहिला धक्का दिला. सिडनी थंडरसाठी हीदर नाइटने सर्वाधिक 59 धावा केल्या. याशिवाय कर्णधार फोबी लिचफिल्डने 40 आणि जॉर्जिया वॉलने 22 धावा केल्या. तर ब्रिस्बेन हीट महिला संघासाठी कर्णधार जेस जोनासेनने 4 षटकात सर्वाधिक 22 धावा आणि 3 बळी घेतले. याशिवाय शिखा पांडे आणि निकोला हॅनकॉक यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

याशिवाय ग्रेस हॅरिसने 41 धावा केल्या. सिडनी थंडर महिला संघातर्फे समंथा बेट्सने 4 षटकात 25 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले. याशिवाय तानेले पेशेल आणि चमारी अथापट्टू यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

(The above story first appeared on LatestLY on Nov 07, 2024 04:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).