IPL Auction 2025 Live

Shoaib Akhtar On Surya Kumar Yadav: सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये एबी डिव्हिलियर्सपेक्षा सरस, शोएब अख्तरने सांगितले कारण

अशा स्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीची चौफेर चर्चा होत आहे.

Suryakumar Yadav And AB de Villiers (Photo Credit - Twitter)

IND vs SL T20: श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) पुन्हा एकदा आपल्या बॅटने कहर केला. सूर्यकुमारने 51 चेंडूत 112 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा टी-20 सामना 91 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली. अशा स्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीची चौफेर चर्चा होत आहे. ज्या एपिसोडमध्ये पाकिस्तानच्या शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) सांगितले की तो एबी डिव्हिलियर्सपेक्षा (AB de Villiers) शंभर टक्के चांगला फलंदाज आहे. यामागचे कारणही अख्तर यांनी दिले आहे.

सूर्यकुमार डिव्हिलियर्सपेक्षा सरस 

सूर्यकुमार यादवच्या अष्टपैलू फलंदाजीबद्दल बोलताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, "माझ्या मते, सूर्यकुमार यादव जेव्हा मैदानात फलंदाजी करतो तेव्हा त्याच्या आत कोणत्याही प्रकारची भीती नसते. तर एबी डिव्हिलियर्सकडे स्वताचा एक क्लास क्रिकेट खेळण्याची खासियत आहे. यामुळेच सूर्यकुमार यादव आता एबी डिव्हिलियर्सपेक्षा 100 टक्के चांगला फलंदाज बनला आहे." (हे देखील वाचा: भरमैदानात Yuzvendra Chahal ने Surya kumar Yadav सोबत केले असे कृत्य, Video पाहून तुमचाही बसणार नाही विश्वास)

सूर्यकुमारने केला हा विक्रम

विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवचा गतवर्षी 2022 चा फॉर्म 2023 मध्येही कायम आहे. गेल्या सहा महिन्यांत सूर्यकुमारने तीन टी-20 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो यांची बरोबरी केली आहे. मॅक्सवेल आणि मुनरो यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रत्येकी तीन शतके झळकावली आहेत. त्याचवेळी सूर्यकुमार यादवने शतकासाठी 45 चेंडूंचा सामना केला. जे त्याच्या टी-20 कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात जलद शतक आहे.