Happy Birthday SuryaKumar Yadav: टीम इंडियाचा 'मिस्टर 360' झाला 34 वर्षांचा, टी-20 इंटरनॅशनलमध्ये केले जबरदस्त रेकॉर्ड; वाचा सविस्तर

त्याने 2021 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मिस्टर 360 ने इंडियन प्रीमियर लीगमध्ये चमकदार कामगिरी केली होती.

SuryaKumar Yadav (Photo Credit - X)

Happy Birthday SuryaKumar Yadav: भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) आज त्याचा 34 वा वाढदिवस (SuryaKumar Yadav Birthday) साजरा करत आहे. टीम इंडियात उशिराने पदार्पण करणाऱ्या सूर्याने अल्पावधीतच आपला दबदबा निर्माण केला आहे. त्याने 2021 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मिस्टर 360 ने इंडियन प्रीमियर लीगमध्ये चमकदार कामगिरी केली होती. यानंतर त्याला टीम इंडियाकडून बोलावण्यात आले. भारतीय संघात प्रवेश केल्यानंतर त्याने निश्चितच आपले स्थान पक्के केले आहे. आणि आज तो भारतीय टी-20 संघाता कर्णधार आहे.

1. सूर्यकुमार यादव यांचा जन्म 14 सप्टेंबर 1990 रोजी मुंबईत झाला. मात्र, तो मूळचा गाझीपूर, उत्तर प्रदेशचा आहे.

2. स्कायने 2010 मध्ये मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याने दिल्लीविरुद्ध 89 चेंडूत 73 धावांची खेळी केली होती.

3. मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडूनही खेळला आहे.

4. मुंबई इंडियन्सने 2020 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. या मोसमात सूर्याने शानदार फलंदाजी केली होती. त्याने 16 सामन्यात 480 धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला टीम इंडियात स्थान मिळाले.

5. सूर्यकुमार यादवने 14 मार्च 2021 रोजी अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.पदार्पणाच्या सामन्यात त्याने 31 चेंडूत 57 धावांची धमाकेदार खेळी करत सर्वांनाच चकित केले.

6. सूर्यकुमार यादवने आतापर्यंत खेळलेल्या 71 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 68 डावांमध्ये 42.66 च्या सरासरीने आणि 168.65 च्या स्ट्राईक रेटने 2432 धावा केल्या आहेत.

7. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 20 अर्धशतके आणि 4 शतके झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 117 धावा आहे.

8. विश्वचषक जिंकण्यात सर्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. हार्दिक पांड्याच्या षटकात सूर्यकुमार यादवचा झेल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 विश्वचषक 2024 मधील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. डेव्हिड मिलरचा झेल घेत सूर्याने सामना भारताच्या झोळीत टाकला. सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जय शाहच्या उपस्थितीत टी दिलीपने सूर्यकुमार यादवला 'फिल्डर ऑफ द मॅच' पदकही दिले.

टी-20 मधील सर्वाधिक 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार

16 - सूर्यकुमार यादव (71 सामने)*

16 - विरनदीप सिंग (84 सामने)

16 - विराट कोहली (125 सामने)

15 - सिकंदर रझा (91 सामने)

14 - मोहम्मद नबी (129) सामने)

14 - रोहित शर्मा (159 सामने)

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके:

5 रोहित शर्मा (भारत)

5 ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)

4 सूर्यकुमार यादव (भारत)

3 कॉलिन मुनरो (न्यूझीलंड)

3 सबावून द्विजी (चेक गणराज्य)

3 मोहम्मद वसीम (यूएई)

3 बाबर आझम (पाकिस्तान)

सूर्यकुमार यादवची कारकीर्द 

सूर्यकुमार यादवने आतापर्यंत भारतासाठी 1 कसोटी, 71 टी-20 आणि 37 एकदिवसीय सामने खेळले आहेत. टी-20 इंटरनॅशनलमध्ये सूर्याने 42.66 च्या सरासरीने 2432 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 4 शतके आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. सूर्याचा टी-20 इंटरनॅशनलमध्ये स्ट्राइक-रेट 168.65 आहे, यावरून त्याची झंझावाती फलंदाजी दिसून येते. सूर्या दीर्घकाळापासून आयसीसी टी-20 क्रमवारीत नंबर 1 फलंदाज आहे. सध्या तो क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सूर्यकुमार यादवची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द 

71 सामने, 2432 धावा, 42.66 सरासरी

4 शतके, 20 अर्धशतके, 168.65 स्ट्राइक रेट

220 चौकार, 136 षटकार

सूर्यकुमारची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्द 

37 सामने, 773 धावा, 25.76 सरासरी

4 अर्धशतके, 105.02 स्ट्राइक रेट

80 चौकार, 19 षटकार

सूर्यकुमार यादवची कसोटी कारकीर्द

1 सामना, 8 धावा, 8.00 सरासरी