DC Vs SRH, IPL 2020: आयपीएलच्या तेराव्या हंगामात सनरायजर्स हैदराबादचा पहिला विजय; 15 धावांनी दिल्ली कॅपिटल्सला केले पराभूत
अबुधाबीच्या शेख जाएद स्टेडियमवर (Sheikh Zayed Stadium) सनराइजर्स हैदराबादच्या संघाने (Sunrisers Hyderabad) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) धावांनी विजय मिळवला आहे.
अबुधाबीच्या शेख जाएद स्टेडियमवर (Sheikh Zayed Stadium) सनराइजर्स हैदराबादच्या संघाने (Sunrisers Hyderabad) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 15 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात आलेल्या हैदराबादच्या संघाने दिल्लीसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना संघ केवळ 147 धावापर्यंत मजल मारू शकला. आयपीएलच्या तेराव्या हंगामात हैदराबादच्या संघाने पहिला विजय मिळवला आहे. तर, दिल्लीच्या संघाची विजयी हॅट्रिक हुकली आहे.
दिल्लीविरूद्धच्या सामन्यात जॉनी बेअरस्टोचे, वॉर्नर, विल्यमसन यांच्या फटकेबाजीच्या जोरावर हैदबादचा संघाने 20 षटकात 4 बाद 162 धावांचे लक्ष्य उभारले. हैदराबादच्या संघाकडून जॉनी बेयरस्टोने 53(48) आणि डेव्हिड वार्नर 45 (33) तर, केन विल्यमसनने केवळ 26 चेंडूत 41 धावा ठोकल्या आहेत. हैदराबादच्या संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ आज डगमगताना दिसला आहे. दिल्लीच्या संघाकडून शिखर धवन याने सर्वाधिक 34 (31 ) धावा केल्या आहेत. हे देखील वाचा- Rahul Tewatia Apologizes To Fans: राजस्थान रॉयल संघाचा अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया याने मागितली चाहत्यांची माफी; ट्विटरवर केली 'अशी' पोस्ट
ट्विट-
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील पहिल्या अकरा सामन्यांनंतर गुणतालिकेमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स प्रत्येकी 2 विजयांसहीत 4 गुणांसोबत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. नेट रनरेटच्या हिशोबाने दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्सपेक्षा सरस असल्याने दिल्ली अव्वल स्थानी आहे. पंजाब, मुंबई, कोलकात्ता, चेन्नई, सनराइजर्स हैदराबाद हे पाचही संघांनी प्रत्येकी एका विजयासहीत दोन गुण मिळवले आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळरू, चौथ्या क्रमांकावर किंग्ज इलेव्हन पंजाब, पाचव्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स, सहाव्या क्रमांकावर सनराइजर्स हैदराबाद, सातव्या क्रमांकावर कोलकाता नाईट राईडर्स, आठव्या क्रमांकावर चेन्नईसुपर किंग्ज आहे.