सुनील गावस्कर (Photo Credit: IANS)

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेश मंत्री चेतन चौहान (Chetan Chauhan) यांचे रविवारी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हृदयविकाराचा झटक्यामुळे निधन झाले. त्यांना मागील महिन्यात कोरोनाची लागण झाली होती तर त्यांची दोन्ही किडनी निकामी झाली होती ज्यामुळे त्यांची स्थिती खालावली होती. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि चौहान, भारताच्या या दोन माजी खेळाडूंनी टीम इंडियाला (Indian Team) अनेकदा शतकी सुरुवात करून द्यायचे. दोघांनी मिळवून संघाच्या विजयाची पायाभरणीही केली. गावस्कर यांनी अनेक संस्मरणीय डाव खेळले, पण चौहान यांना एकही शतक करता आले नाही. दोघांनी एकत्र अनेक मोलाच्या भागीदारी रचल्या. चौहान यांच्या निधनानंतर गावस्कर यांनी दोघांच्या एका आठवणीला उजाळा दिला जेव्हा जेव्हा दिल्लीत दोघे भेटले. 1969 ते 1978 दरम्यान भारतासाठी 40 कसोटी सामने खेळणारे चौहान हा रेड बॉल क्रिकेटमध्ये गावस्करसोबत पहिल्या विकेटसाठी 10 शतकी भागीदारी झाली. (Chetan Chauhan Passes Away: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तरप्रदेशातील मंत्री चेतन चौहान यांचे निधन)

गावस्कर यांनी चौहान यांना श्रद्धांजली वाहिली. जेव्हा जेव्हा ते दिल्लीतील फिरोजशाह कोटला येथे भेटले तेव्हा त्यांना जीवनातील अनिवार्य षटकांची आठवण कशी होती हे आठवतेले. "बैठक नेहमीच त्याच्या लाडक्या फिरोजशाह कोटला मैदानावर होती जिथे तो खेळपट्टीच्या तयारीसाठी प्रभारी होता. जशी मी त्याला मिठी मारायचो मी त्याला म्हणायचो की "नाही, नाही, आपल्याला आणखी एक शतकी भागीदारी कार्याची आहे" आणि त्यावर तो हसून प्रत्युत्तर द्यायचा की,"अरे बाबा, शतक तू ठोकायचा, मी नाही." चेतनचे शब्द आयुष्याच्या अनिवार्य ओव्हरमध्ये अशा पद्धतीने खरे ठरतील असा मी विचारही केला नव्हता. मी पुढे दिल्लीला जाईल आणि तेथे त्याचा हसरा चेहरा दिसणार नाही, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही."

गावस्कर आणि चौहान यांनी 59 डावांमध्ये 53.75 च्या सरासरीने विक्रमी 3,010 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या 1980/81 दौऱ्यावर दोनदा शतक करण्याची चौहान यांची संधी हुकली. “अ‍ॅडिलेडमधील दुसर्‍या कसोटीत तो 97 व्या वर्षावर होता तेव्हा माझ्या सहकार्याने मला टीव्हीसमोर खेचलले आणि बाल्कनीत नेले. मी बाल्कनीत आलो की खेळाडू बाद होतो अशी माझी अंधश्रद्धा होती, त्यामुळे मी नेहमी ड्रेसिंगरूममध्ये टीव्हीवरून सामना पाहायचो. पण, खेळाडूंच्या आग्रहावर मी बाल्कनीत आलो आणि चेतन डेनिस लिलीच्या चेंडूवर बाद झाला. चेतनचे शतक हुकल्याबद्दल मी जबाबदार असल्याचा माझा विश्वास वाटणारा दुसरा प्रसंग होता जेव्हा चुकीच्या पद्धतीने बाद दिल्यावर मी माझा सयंम गमावला. माघारी परताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत माझा वाद झाला ज्यामुळे चेतनच्या एकाग्रतेवर परिणाम झाला आणि तो पुन्हा शतक करू शकला नाही."