Sunil Gavaskar यांनी Team India मॅनेजमेंटवर भेदभावाचा केला आरोप, म्हणाले- ‘भारतीय संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम’
भारतीय संघाचे माजी कर्णधाराने म्हटले की, संघाचे गोलंदाज आर अश्विन आणि टी नटराजन यांसारख्या खेळाडूसोबत भेदभाव केला जातो. कारण संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम आहेत.
टीम इंडियाचे (Team India) माजी फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय संघात (Indian Cricket Team) भेदभाव होत असल्याचे म्हटले आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधाराने म्हटले की, संघाचे गोलंदाज आर अश्विन (R Ashwin) आणि टी नटराजन (T Natarajan) यांसारख्या खेळाडूसोबत भेदभाव केला जातो. कारण संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम आहेत. गावस्कर यांनी कर्णधार विराट कोहलीवरही टीका केली, ज्याला आपल्या मुलाच्या जन्मामुळे ऑस्ट्रेलियाहून (Australia) भारतात (India) परत जाण्याची परवानगी मिळाली होती, तर आयपीएल प्ले-ऑफ दरम्यान वडील बनलेला वेगवान गोलंदाज टी नटराजन अद्यापही आपल्या मुलीला पाहू शकलेला नाही. IANS मध्ये नमूद केल्यानुसार गावस्कर यांनी स्पोर्ट्स स्टारमध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात गावस्कर यांनी टीम मॅनेजमेंटवर पितृत्व रजेबाबत भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. (भारतात परतण्यापूर्वी विराट कोहली याने बोलावली खास मिटिंग; संघातील युवा खेळाडूंना केले मार्गदर्शन)
गावसकर यांनी लिहिले, “मागील काही काळापासून अश्विनला संघर्ष करावा लागत आहे. त्याच्या गोलंदाजी क्षमतेत काही कमी आहे म्हणून नाही, तर यासाठी की तो संघाच्या बैठकीमध्ये आपले मत मांडतो. त्याच्या व्यतिरिक्त बाकी सर्व खेळाडू फक्त मान हलवतात. मग ते त्या गोष्टीशी सहमत असो किंवा नसो.” त्यांनी पुढे म्हटले की, “350 हुन अधिक कसोटी विकेट घेतलेल्या गोलंदाजाचे इतर कुठल्याही देशात स्वागत होते आणि चार कसोटी शतकेसुद्धा विसरू नका. जर त्याने पहिल्या सामन्यात विकेट्स घेतल्या नसत्या, तर त्याला दुसर्या कसोटीतून बाहेर केले असते. असे कोणत्याही स्थापित फलंदाजाबाबत केले जात नाही. जर तो फ्लॉप ठरला, त्या नंतरही पुढील सामन्यात त्याला संधी मिळते आणि पुन्हा पुन्हा संधी मिळत राहते. मात्र, अश्विनसाठी पूर्णपणे वेगळे नियम आहेत.” गावस्कर म्हणाले की, नटराजनला फक्त नेट गोलंदाज म्हणूनच मागे राहणे भाग पडले आहे. नटराजन ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित ओव्हरच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
“आणखी एक खेळाडू तुम्हाला नियमांना घेवून हैराण करेल, परंतु याबद्दल कोणीच आवाज उठवणार नाही. एक नवीन खेळाडू म्हणजे नटराजन, डाव्या हाताचा यॉर्कर खासियत असलेला, ज्याने टी-20 मध्ये पदार्पण करताना सर्वांना प्रभावित केले. आयपीएलचे प्ले-ऑफ सुरु असताना नटराजन पहिल्यांदा वडील झाला आणि त्याला युएईतून थेट ऑस्ट्रेलियाला नेण्यात आले. त्याच्या नंतर उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला कसोटी मालिकेसाठी सुद्धा थांबवण्यात आले, पण संघाचा भाग म्हणून नाही, तर फक्त नेट गोलंदाज म्हणून. कल्पना करा की दुसर्या स्वरूपातील मॅच-विनरला नेट गोलंदाज म्हणून ठेवले जाईल. जानेवारीच्या तिसर्या आठवड्यात मालिका संपल्यानंतरच तो घरी परत येईल आणि पहिल्यांदाच आपल्या मुलीला भेटेल. त्याचबरोबर कर्णधार कोहली) आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी पहिल्या कसोटीनंतर भारतात जात आहे. ते भारतीय क्रिकेट आहे. भिन्न लोकांसाठी भिन्न नियम. माझ्यावर विश्वास ठेवत नसेल तर रवी अश्विन आणि टी नटराजन यांना विचारा,” गावसकर यांनी पुढे लिहिले.