Sunil Gavaskar On Team India: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांची खराब कामगिरी, सुनील गावस्कर यांनी केली टीका; म्हणाले...

भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीबद्दल टीका करताना म्हटले की, 'खेळपट्टीने त्यांच्या मनावर वर्चस्व गाजवले'.

सुनील गावस्कर (Photo Credit: IANS)

इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND vs AUS) तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा 9 विकेट्सनी पराभव झाल्यानंतर भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) भडकले आहेत. सुनील गावसकर यांनी टीम इंडियावर (Team India) काचेसारखी टिंगल टवाळी केली आहे. सुनील गावस्कर यांनी अचानकपणे आपल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीबद्दल टीका करताना म्हटले की, 'खेळपट्टीने त्यांच्या मनावर वर्चस्व गाजवले'. (हे देखील वाचा: IND vs AUS 3rd Test: टीम इंडियाचा गेल्या 10 वर्षात घरच्या मैदानावर तिसरा पराभव, स्टीव्ह स्मिथची चमक कायम)

गावस्कर यांनी टीम इंडियावर खरमरीत केली टिप्पणी

फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर पहिल्याच चेंडूपासून भारतीय संघाला दोन्ही डावात 109 आणि 163 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशीच हा सामना नऊ गडी राखून जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. सुनील गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, 'फलंदाजांनी त्यांच्या प्रतिभेला खरोखर न्याय दिला नाही. जर तुम्ही भारतीय विकेट्सच्या पडझडीवर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की भारतीय फलंदाजांनी त्यांच्याच चुकांमुळे विकेट गमावल्या. तो असे काही फटके खेळत होते, की खेळपट्टीवरून चेंडू कसा येईल याचा अंदाज त्याला आधीच आला होता.

भारतीय फलंदाजीमध्ये आत्मविश्वासाची कमतरता

गावसकर म्हणाले, 'तुम्ही पाहिल्यास, भारतीय फलंदाजीमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे कारण रोहित शर्माशिवाय पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्यांनी धावा केल्या नाहीत. रोहितने नागपुरात शानदार शतक झळकावले होते. जेव्हा तुमच्या खात्यात धावा कमी होतात, तेव्हा फलंदाजीत काहीशी अस्थिरता येते. हा माजी दिग्गज म्हणाला, 'खेळपट्टीवर चेंडूच्या जवळ जाणे त्यांना शक्य होत नव्हते. त्याने खेळपट्टीवर वर्चस्व गाजवू दिले. खेळपट्टीनेच त्याच्या मनावर पहिल्या डावातच वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. हा प्रभाव दुसऱ्या डावात अधिक होता.