Stuart Broad Fined: आयसीसी नियमांचा भंग केल्याप्रकरणी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला दंड
मात्र, अष्टपैलू खेळाडू क्रिस वोक्स आणि जॉस बटलर यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानला पराभूत केले.
पाकिस्तानविरूद्ध (England Vs Pakistan) पहिल्या कसोटी सामन्यात आसीसीच्या (ICC) नियमांचा भंग केल्याप्रकरणी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला दंड ठोठवण्यात आला आहे. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावातील 46 षटका दरम्यान स्टुअर्ट ब्रॉड आणि पाकिस्तान फलंदाज यासिर शहा यांच्यात बाचाबाची सुरु होती. दरम्यान, स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) आक्रमक भाषेचा वापर करुन प्रतिस्पर्ध्याला चिथवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पंच रिचर्ड केटलबुरो आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांनी केला आहे. त्यानुसार, त्याच्या मानधनातील 15 टक्के रक्कम कापून घेण्यात आली आहे. तसेच आयसीसी नियमांचा भंग केल्याप्रकरणी त्याच्या खात्यावर 1 डिमेरीट पॉईंटही जमा करण्यात आला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने पहिल्या डावात 326 धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांनी कमाल करत इंग्लंडला अवघ्या 219 धावांवर रोखले. मात्र, दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली आणि पाकिस्तानच्या संघाला दुसऱ्या डावात केवळ 169 धावा करता आल्या. अखेरच्या डावात पाकिस्तानने दिलेले 277 धावांचे आव्हान पूर्ण करत इंग्लंड विजयाचा दुष्काळ दूर केला आहे. तब्बल 2 वर्षानंतर इंग्लंडने कसोटी सामन्यात पाकवर विजय मिळवला आहे. हे देखील वाचा- Happy Janmashtami 2020: सचिन तेंडुलकर, युवराज सिंह व इतर टीम इंडिया खेळाडूंनी दिल्या शुभेच्छा; दरवर्षी प्रमाणे दहीहांडी उत्सव न होण्याचा अजिंक्य रहाणेला खेद (See Tweets)
आयसीसीचे ट्वीट-
पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना काही काळासाठी इंग्लंच्या संघाचीही दमछाक झाली होती. मात्र, अष्टपैलू खेळाडू क्रिस वोक्स आणि जॉस बटलर यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानला पराभूत केले. दुसऱ्या डावात वोक्सने 80 तर बटलरने 75 धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडून यासिर शाह याने सर्वाधिक 4 विकेट मिळवल्या, तर शाहीन अफरीदी, मोहम्मद अब्बास आणि नसीम शाह याला प्रत्येकी एक फलंदाज बाद केले आहेत.य