Ashes Series 2019: स्टीव्ह स्मिथ याने घेतलेला शानदार झेल पाहून व्हाल थक्क, पाहा व्हिडिओ
अॅशेस मालिकेत स्मिथने त्याच्या फलंदाजीच्या जोरावर 700 हून अधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इग्लंड यांच्यात ओव्हल मैदानात पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्या दरम्यान स्मिथने क्रिस वोक्स याची झेल घेतली आहे. स्मिथचा हा सर्वोकृष्ट झेल पाहून मैदानात असलेले प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत.
अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथने सर्वोकृष्ट कामगिरी करुन त्याच्या चाहत्याचे मन जिंकले आहे. अॅशेस मालिकेत स्मिथने त्याच्या फलंदाजीच्या जोरावर 700 हून अधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इग्लंड यांच्यात ओव्हल मैदानात पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्या दरम्यान स्मिथने क्रिस वोक्स याची झेल घेतली आहे. स्मिथचा हा सर्वोकृष्ट झेल पाहून मैदानात असलेले प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत.
चेंडूसोबत छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ याला 1 वर्ष क्रिकेट खेळण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. परंतु 1 वर्षानंतर क्रिकेटमध्ये पुन्हा आगमन झाल्यानंतर स्मिथने चांगले प्रदर्शन करुन दाखवले आहे. सध्या ओव्हल येथे सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात स्मिथने घेतलेला झेल चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर त्याने घेतलेला झेलचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे देखील वाचा- Afghanistan Vs Zimbabwe: 7 चेंडूत ठोकले 7 षटकार, तरीदेखील युवराज सिंहचे रेकार्ड कायम.
ट्वीट-
पाचव्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या सेशनमध्ये क्रिस वोक्स फलंदाजी करत होता. मिचेल मार्श याच्या गोलंदाजीच्या शेवटच्या चेंडूवर क्रिस वोक्स याच्या बॅटला चेंडू लागून सेकंड स्लिपला उभा असलेला स्मिथ याच्याकडे गेला. स्मिथने डाईव्ह मारून एक हाती झेल घेवून मैदानात असलेल्या प्रत्येकाला त्याने आश्चर्याचा धक्का दिला. इग्लंडचा फलंदाज वोक्सलाही झेल पाहून स्वता: वर विश्वास बसला नाही