Sri Lanka Time out Celebration: श्रीलंकेच्या खेळाडूंनी मालिका विजयानंतर केले टाईम आऊट सेलिब्रेशन, बांगलादेशच्या कर्णधारानेही दिले प्रत्युत्तर (Watch Video)

2023 मध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील दोन्ही संघांमधील सामना हे त्यांनी असे सेलिब्रेट करण्यामागचे कारण आहे.

Sri Lanka Time out Celebration (Photo Credit - X)

SL vs BAN: श्रीलंकेने बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना 28 धावांनी (SL Beat BAN) जिंकला. यासह त्याने ही मालिका 2-1 अशी जिंकण्यात यश मिळविले. श्रीलंकेच्या संघातील सर्व खेळाडूंनी ट्रॉफीसोबत फोटो काढल्यानंतर त्यांनी टाईम आऊट सेलिब्रेशन (Time Out Celebration) केले. 2023 मध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील दोन्ही संघांमधील सामना हे त्यांनी असे सेलिब्रेट करण्यामागचे कारण आहे. त्या सामन्यात बांगलादेश संघाने अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट बाद दिला होता आणि तेव्हापासून दोन्ही संघांमध्ये एक वेगळीच कटुता मैदानावर पाहायला मिळत आहे. मॅथ्यूज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरला टाईम आऊटमुळे पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. (हे देखील वाचा: SL vs BAN Match Controversy: श्रीलंका-बांगलादेश सामन्यात पुन्हा एकदा वादाला फुटले तोंड, श्रीलंकेचा संघ अंपायरशी भिडला; पाहा व्हिडिओ)

पाहा व्हिडिओ

कुसल मेंडिसने आपल्या संघाच्या सेलिब्रेशनचा केला बचाव 

या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेश संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लामने अविष्का फर्नांडोची विकेट घेतल्यानंतर हातातल्या घड्याळाकडे बोट दाखवून विकेट घेण्याचा आनंद साजरा केला. दुसरीकडे, श्रीलंकन ​​संघाचा एकदिवसीय संघाचा कर्णधार कुसल मेंडिसने आपल्या संघाने अशा प्रकारे सेलिब्रेट केल्याचा बचाव करताना, ईएसपीएन क्रिकइन्फोमध्ये दिलेल्या निवेदनानुसार, तो म्हणाला की, आम्ही आनंदी होतो म्हणून आम्ही अशा प्रकारे सेलिब्रेशन केले. इतर कोणीतरी एक वेळ बाहेर साजरा केला होता आणि आम्हाला का माहित नाही. मला वाटते की आम्ही ते केले कारण आम्ही आनंदी होतो.

बांगलादेशच्या कर्णधारानेही दिले प्रत्युत्तर 

बांगलादेश संघाच्या कर्णधाराला श्रीलंकेच्या संघाने अशाप्रकारे सेलिब्रेशन कसे केले, असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, तुम्ही आक्रमक व्हा, असे नाही. मला वाटतं त्याने आता त्या प्रसंगातून बाहेर पडून वर्तमानात जगायला हवं. त्यावेळी आम्ही नियम पाळले. त्याबद्दल ते घाबरले आहेत. मला त्याची फारशी चिंता नाही.