SL vs NZ T20I: न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी श्रीलंका संघ जाहीर; लसिथ मलिंगा कर्णधार, थिसारा परेरा याला डच्चू
न्यूझीलंडविरुद्ध आगामी टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघात अॅन्जेलो मॅथ्यूज आणि थिसारा परेरा या दिग्गज खेळाडूंसह सुरंगा लकमल आणि धनंजया डी सिल्वा यांना डच्चू दिला आहे.
श्रीलंकेचा (Sri Lanka) यॉर्कर स्पेशलिस्ट लसिथ मलिंगा (Lasith Malinga) न्यूझीलंड (New Zealand) संघाविरुद्ध आगामी टी-20 मालिकेसाठी संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. मलिंगाने नुकतेच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध आगामी टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघात अॅन्जेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) आणि थिसारा परेरा (Thisara Perera) या दिग्गज खेळाडूंसह सुरंगा लकमल (Suranga Lakhmal) आणि धनंजया डी सिल्वा (Dhananjaya de Silva) यांना डच्चू दिला आहे. निवड समितीने संघाची युवा खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये फक्त दोनच खेळाडू आहेत 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत- कर्णधार लसिथ मलिंगा आणि वेगवान गोलंदाज ईसूरु उदाना. (SL vs NZ 2019: श्रीलंकाविरुद्ध टी-20 साठी टिम साऊथी करणार न्यूझीलंडचे नेतृत्व; केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट यांना डच्चू)
आगामी न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी मलिंगा संघाचे नेत्रत्व करेल तर, निरोशन डिकवेला याला संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. जानेवारी 2019 मध्ये श्रीलंकेसाठी अंतिम आंतरराष्ट्रीय खेळलेला दानुष्का गुणथिलाका याचे श्रीलंकेच्या संघात पुनरागमन झाले आहेत. दक्षिण आफ्रिकाविरूद्ध टी -20 मालिका गमावण्यास भाग पडणाऱ्या कुसल परेरा, लाहिरू कुमारा याच्यासह थिसारा परेरा, धनंजया डी सिल्वा आणि सुरंगा लकमल या नऊ खेळाडूंना वगळण्यात आले आहे. दुसरीकडे, शेहान जयसूर्या, दासुन शनाका, वनिंदू हसरंगा, कसुन राजिता, आणि लाहिरू मदुशंका यांना श्रीलंकेच्या संघात स्थान देण्यात आले आहेत. तर, अँजेलो परेरा, जेफ्री वेंडरसे, कमिंदु मेंडिस, सदिरा समाराविक्रमा, प्रियामल परेरा आणि असिथा फर्नांडो सारखे युवा खेळाडू संघात स्थान मिळवू शकले नाही.
न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 1 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून सर्व खेळ पालेकेले येथे खेळले जातील. दुसरा सामना 3 सप्टेंबर रोजी खेळला जाईल तर मालिका 6 सप्टेंबर रोजी अंतिम सामन्याने संपुष्टात येईल. असा आहे श्रीलंका संघ: लसिथ मलिंगा (कॅप्टन), निरोशन डिकवेला, अविष्का फर्नांडो, कुसल पेरेरा, दनुष्का गुणथिलाका, कुसल मेंडिस, शेहन जयसूर्या, दासुन शनाका, वनिंदू हसरंगा, अकिला डानंजया, लक्ष संदकन, इसुरु उदाना, कसुन राजिता, लाहिरू कुमार आणि लाहिरू मदुशंका.