SRH Vs RR IPL 2021 Match 40 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात रंगणार सामना, Star Sports Network वर पाहता येणार लाईव्ह प्रक्षेपण
दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. हैदराबादच्या संघाचे नेतृत्व केन विल्यमसन करीत आहे. तर, राजस्थानच्या कर्णधारपदाची जबाबदारी संजू सॅमसन संभाळत आहे.
आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 14) 40व्या सामन्यात आज (27 सप्टेंबर) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आज आमने-सामने येणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. हैदराबादच्या संघाचे नेतृत्व केन विल्यमसन करीत आहे. तर, राजस्थानच्या कर्णधारपदाची जबाबदारी संजू सॅमसन संभाळत आहे. भारतीय वेळेनुसार, सायंकाळी 7 वाजता टॉस होईल. तसेच 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. हैदराबाद विरुद्ध राजस्थान यांच्यातील आयपीएल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर लाईव्ह प्रसारित केला जाईल तर Disney+ Hotstar अॅप आणि वेबसाईटवर सामना लाईव्ह स्ट्रीम केला जाईल.
Disney+ Hotstar यंदा देखील आयपीएलचे स्ट्रीमिंग पार्टनर आहे. हैदराबाद विरुद्ध राजस्थान यांच्यातील आयपीएलचा 40वा सामना लाईव्ह प्रसारित केला जाणार आहे. आजचा सामना पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनवर Disney+ Hotstar डाउनलोड करू शकतात. दरम्यान, दोन्ही संघातील आजचा आयपीएलचा सामना लाईव्ह पाहण्यासाठी Android यूजर्ससाठी हॉटस्टार गुगल स्टोअरवर उपलब्ध असेल, तर Apple मोबाईल यूजर्ससाठी अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. हे देखील वाचा- IPL 2021 Points Table Updated: KKR वरील विजयानंतर चेन्नई अव्वल स्थानी, तर RCB चा तिसऱ्या क्रमांकावर ताबा; मुंबईला झाले मोठे नुकसान
सनरायझर्स हैदराबाद संघ:
डेव्हिड वॉर्नर, रिद्धिमान साहा (विकेटकिपर), केन विल्यमसन (कर्णधार), मनीष पांडे, केदार जाधव, अब्दुल समद, जेसन होल्डर, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद, जेसन रॉय, शाहबाज नदीम, मुजीब उर रहमान, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, मोहम्मद नबी, विराट सिंग, बेसिल थम्पी, जगदीशा सुचित, अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, उम्रान मलिक.
राजस्थान रॉयल्स संघ:
यशस्वी जैस्वाल, लियाम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन (विकेटकिपर, कर्णधार), डेव्हिड मिलर, महिपाल लोमर, रियान पराग, राहुल तेवातिया, कार्तिक त्यागी, चेतन साकरिया, तबराईज शम्सी, मुस्तफिजुर रहमान, जयदेव उनाडकट, ख्रिस मॉरिस, मनन वोहरा, एव्हिन लुईस, श्रेयस गोपाल, केसी करिअप्पा, ग्लेन फिलिप्स, शिवम दुबे, ओशाने थॉमस, मयंक मार्कंडे, अनुज रावत, जेराल्ड कोएट्झी, कुलदीप यादव, आकाश सिंह.