SRH vs RCB IPL 2021 Match 6: डेविड वॉर्नरने जिंकला टॉस, हैदराबादचा गोलंदाजीचा निर्णय; Devdutt Padikkal याचा आरसीबी प्लेइंग XI मध्ये समावेश, पहा कोणाला मिळाला डच्चू
इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सहाव्या सामन्यात एसआरएच कर्णधार डेविड वॉर्नरने टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद आणि बेंगलोर संघातील आजचा आयपीएल सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे.
SRH vs RCB IPL 2021 Match 6: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यातील सहाव्या सामन्यात एसआरएच कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद आणि बेंगलोर संघातील आजचा आयपीएल (IPL) सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. आजच्या सामन्यासाठी आरसीबीने (RCB) आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक तर हैदराबादने दोन मोठे बदल केले आहेत. रॉयल चॅलेंजर्सने नवोदित फलंदाज रजत पाटीदारला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले असून त्याच्या जागी देवदत्त पडिक्क्लचा (Devdutt Padikkal) समावेश केला आहे. आयपीएलच्या सुरुवातीपूर्वी पदिक्काल कोरोना पॉसिटीव्ह आढळल्यामुळे त्याला पहिल्या सामन्यातून बाहेर बसावे लागले होते. हैदराबादने जेसन होल्डर (Jason Holder) आणि शाहबाझ नदीमचा (Shahbaz Nadeem) समावेश केला आहे तर मोहम्मद नबी आणि संदीप शर्मा यांना डच्चू दिला आहे. (IPL 2021: Glenn Maxwell ने उघडलं गुपित, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहलीने RCB संघात सामील होण्याची दिली होती ऑफर)
आरसीबीच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे तर पडिक्क्ल कर्णधार विराट कोहलीसह सलामीला उतरेल. शाहबाझ नदीम तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला उतरेल तर शाहबाझ नदीम, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स आणि डॅनियल ख्रिश्चन यांच्या मधल्या फळीची जबाबदार असेल. वॉशिंग्टन सुंदर संघातील अष्टपैलू आहेत. युजवेंद्र चहल एकमेव फिरकीपटू आहे तर हर्षल पटेल, काईल जेमीसन आणि मोहम्मद सिराज संघाचा वेगवान गोलंदाजी विभाग सांभाळतील. दुसरीकडे, हैदराबादने मागील सामन्यातील आपल्या इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. रिद्धिमान साहा आणि कर्णधार डेविड वॉर्नर डावाची सुरुवात करतील. मधल्या फळीत मनीष पांडे, जॉनी बेयरस्टो, जेसन होल्डर आणि अब्दुल समद फलंदाजी करताना दिसतील. विजय शंकर संघात अष्टपैलूची भूमिका बजावेल. गोलंदाजी विभागात त्यांच्याकडे राशिद खान, भुवनेश्वर कुमार, टी नाटर्सजन आणि शाहबाझ नदीम आहेत.
पहा हैदराबाद-बेंगलोर प्लेइंग इलेव्हन:
सनरायझर्स हैदराबाद इलेव्हन: डेविड वॉर्नर (कॅप्टन), रिद्धिमान साहा, मनीष पांडे,जॉनी बेयरस्टो, जेसन होल्डर, अब्दुल समद, विजय शंकर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि शाहबाझ नदीम.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), देवदत्त पडिक्क्ल, शाहबाझ नदीम, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅनियल ख्रिश्चन, काईल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)