SRH vs RCB, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney+ Hotstar वर

इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या आवृत्तीचा तिसरा सामना आज संध्याकाळी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर डेविड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबाद आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जाणार आहे. भारतात प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. आपण या सामन्याचे थेट प्रवाह Disney+ Hotstar अ‍ॅपवर पाहू शकता.

SRH vs RCB, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney+ Hotstar वर
सनरायझर्स हैदराबादआणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: File Image)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या आवृत्तीचा तिसरा सामना आज संध्याकाळी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर डेविड वॉर्नरच्या (David Warner) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात खेळला जाणार आहे. आयपीएल 2020 चा तिसरा सामना सनरायझर्स हैदराबादआणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सोमवार, 21 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल आणि टॉस सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7.00 वाजता होईल. भारतात प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. आपण या सामन्याचे थेट प्रवाह Disney+ Hotstar अ‍ॅपवर पाहू शकता. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020: 'तंत्रज्ञान वापरता येत नसेल तर ते काय कामाचे?' शॉर्ट रन वादावर प्रीती झिंटा, वीरेंद्र सेहवाग संतापले, BCCIकडे KXIP मालकीणने केली मागणी)

शनिवारी चेन्नई आणि गतविजेत्या मुंबई यांच्यात या स्पर्धेचा पहिला सामना खेळला गेला. सीएसकेने मुंबईचा पाच गडी राखून पराभव केला, तर रविवारी खेळलेला दुसरा सामना बर्‍यापैकी रोमांचक ठरला. दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेला आयपीएलकॅग दुसरा सामना बरोबरीत सुटला आणि सुपर-ओव्हरमध्ये दिल्लीने नाट्यमय पद्धतीने विजय मिळवला. आजच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही टीमकडे जबरदस्त फलंदाज आहेत, त्यामुळे दोन्ही टीमकडून चौकर-षटकारांचा खेळ पाहायाला मिळू शकतो. वॉर्नरच्या नेतृत्वात हैदराबादने एकदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे, तर विराट कोहलीच्या बेंगलोरने तीन वेळा अंतिम फेरी गाठली, परंतु तिन्ही वेळा हे जेतेपद मिळविण्यात अपयशी ठरले. कोहली विजयी सुरुवातीच्या जोरावर पहिल्या विजेतेपदावर नजर ठेवून आहे, तर हैदराबाद पुन्हा एकदा विजेतेपदाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल.

येथे पाहा दोन्ही संघ

सनरायझर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), खलील अहमद, संदीप शर्मा, रिद्धिमान साहा, फॅबियन ऍलन, टी नटराजन, बेसिल थंपी, संजय यादव, अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, मनीष पांडे, विराट सिंह, विजय शंकर, अब्दुल समद, मोहम्मद नबी, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, श्रीवत गोस्वामी, सिद्धार्थ कौल, मिशेल मार्श, केन विल्यमसन, शाहबाज नदीम, बावनका संदीप आणि बिली स्टॅनलेक.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कॅप्टन), आरोन फिंच, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, क्रिस मॉरिस, डेल स्टेन, नवदीप सैनी, पार्थिव पटेल (विकेटकिपर ), एबी डिव्हिलियर्स, गुरकीरत सिंह मान, शिवम दुबे, मोईन अली, पवन नेगी, अ‍ॅडम झांपा, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, देवदत्त पडिकक्कल, जोश फिलिप, युजवेंद्र चहल, उमेश यादव आणि ईसूरु उदाना.

(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2020 04:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).