SRH vs RCB, IPL 2020: डेविड वॉर्नरने टॉस जिंकत घेतला पहिले गोलंदाजीचा निर्णय, पाहा हैदराबाद आणि बेंगलोरचा Playing XI

सामन्यापूर्वी हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सनरायझर्स हैदराबादआणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: File Image)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020चा तिसरा सामना सोमवार, 21 सप्टेंबर रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर्स (Royal Challengers Bangaloer) आणि सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. सामन्यापूर्वी हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोहलीच्या नेतृत्त्वाखालील बेंगलोरने चांगले प्रदर्शन केले आहे, पण तरीही त्यांचे पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अजूनही पूर्ण झाले नाही. आजच्या सनरायझर्सविरुद्ध आयपीएलच्या (IPL) पहिल्या सामन्यासाठी विराटने धुरंदर फलंदाजांनी भरलेल्या चॅलेंजर्सचा संघ निवडला आहे. दुसरीकडे, वॉर्नरने देखील जबरदस्त प्लेइंग इलेव्हन निवडला आहे. (IPL 2020: SRH विरुद्ध आयपीएल सामन्यापूर्वी एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली यांच्यासह RCB खेळाडूंनी जर्सी, ट्विटर हँडलवर बदलले नाव; 'हे' आहे कारण)

हैदराबादकडून वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) डावाची सुरुवात करतील. वॉर्नर आणि बेयरस्टो यांना आयपीएलमधील सर्वात खतरनाक सलामी जोडी म्हणून ओळखली जाते. मनीष पांडे, विजय शंकर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, युवा प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा यांना हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहेत. भारताचा अंडर-19 2020 वर्ल्ड कप कर्णधार प्रियम गर्ग, ऑस्ट्रेलियाचा मिशेल मार्श आणि टी नटराजन यांनी हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. दुसरीकडे, आरसीबीच्या (RCB) प्लेइंग इलेव्हनमधून यंदा पार्थिव पटेलला बाहेर करण्यात आले आहे. देवदत्त पड्डीकल आणि ऑस्ट्रेलियाचा मर्यादित ओव्हरचा कर्णधार आरोन फिंच यांनी आरसीबीकडून पदार्पण केले. आरसीबीकडून पड्डीकल आणि फिंच डावाची सुरुवात करतील. विराट तिसऱ्या तर डिव्हिलियर्स तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करेल. आरसीबीने यंदा विकेकीपिंगची जबाबदारी जोश फिलिपकडे सोपवली आहे.

पाहा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर्स आणि सनरायझर्स हैद्राबादचे प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर्स: विराट कोहली (कॅप्टन), देवदत्त पड्डीकल, आरोन फिंच, एबी डिविलियर्स, जोश फिलिप, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, डेल स्टेन, नवदीप सैनी, उमेश यादव, आणि युजवेंद्र चहल.

सनरायझर्स हैद्राबाद: डेविड वॉर्नर (कॅप्टन), जॉनी बेयरस्टो, मनिष पांडे, विजय शंकर, मिशेल मार्श, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, राशिद खान, संदीप शर्मा, भुवनेश्वर कुमार, आणि टी नटराजन.