SRH Vs MI, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 56व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स (Sunrisers Hyderabad Vs Mumbai Indians) आज एकमेकांशी भिडणार आहेत. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.

SRH Vs MI, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
मुंबई इंडियन्स (Photo Credit: Twitter/IPL)

SRH Vs MI, 56th IPL Match 2020: आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 56व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (Sunrisers Hyderabad Vs Mumbai Indians) आज एकमेकांशी भिडणार आहेत. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाचे नेतृत्व डेव्हिड वार्नर (David Warner) करत आहेत. तर, मुंबई इंडियन्सच्या संघाचे कर्णधार पद किरोन पोलार्ड (Kieron Pollard) संभाळत आहे. भारतीय वेळेनुसार, आज 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.

या हंगामात सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स संघाने प्रत्येकी 13 सामने खेळले आहेत. यापैकी मुंबईच्या संघाने 9 सामने खेळले असून 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. महत्वाचे म्हणजे, मुंबईच्या संघाने प्ले-ऑफच्या फेरीत प्रवेश केला आहे. तर, हैदराबादच्या संघाकडे 12 गुण आहेत. यामुळे प्ले-ऑफच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी हैदराबादच्या संघाला आजच्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. हे देखील वाचा- IPL 2020: 'हिटमॅन इज बॅक'! मुंबई इंडियन्सच्या अंतिम लीग सामन्यापूर्वी रोहित शर्माचा नेटमध्ये कसून सराव, पाहा व्हिडिओ

सनरायझर्स हैदराबाद:

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), अभिषेक शर्मा, बेसिल थंपी, यरा पृथ्वीराज, बिली स्टॅनलेक, जॉनी बेयरस्टो (यष्टीरक्षक), केन विल्यमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल , खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, वृध्दिमान साहा, अब्दुल समद, फॅबियन अलन, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, संदीप बावनका, संजय यादव, विराट सिंग.

मुंबई इंडियन्स:

रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, किरोन पोलार्ड (कर्णधार), हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन, सौरव तिवारी, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, क्रिस लिन, मिशेल मॅकक्लेनाघन, नॅथन कूटर-नाईल, जयंत यादव, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, मोहसिन खान, शेरफेन रदरफोर्ड, दिग्विजय देशमुख, प्रिंस बलवंत राय.

(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2020 03:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).