SRH vs KXIP, IPL 2020: डेविड वॉर्नर-जॉनी बेअरस्टोची जोडी जमली! SRH फलंदाजांची विक्रमी भागीदारी; हैदराबाद कर्णधारने केली अनोख्या अर्धशतकाची नोंद

ल्लेखनीय म्हणजे, केवळ वॉर्नर आणि शिखर धवनच्या जोडीने आयपीएलमध्ये वॉर्नर आणि बेअरस्टोच्या भागीदारीपेक्षा अधिक 100हुन धावांची भागीदारी केली आहे.

डेविड वॉर्नर-जॉनी बेअरस्टो (Photo Credit: PTI)

SRH vs KXIP, IPL 2020: दुबई येथे सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) सामन्यात सनरायझर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) सलामी जोडी डेविड वॉर्नर (David Warner) आणि जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) जोरदार फटकेबाजी केली किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांनी नाकीनऊ आणले. आयपीएलमध्ये (IPL) वॉर्नर आणि बेअरस्टो यांनी 16व्या डावात 5व्या 100हुन धावांच्या भागीदारीची नोंद केली. वॉर्नर आणि बेअरस्टोच्या जोडीने अवघ्या 15 षटकात 160 धावा जोडल्या. उल्लेखनीय म्हणजे, केवळ वॉर्नर आणि शिखर धवनच्या जोडीने आयपीएलमध्ये वॉर्नर आणि बेअरस्टोच्या भागीदारीपेक्षा अधिक 100हुन धावांची भागीदारी केली आहे. वॉर्नर आणि धवनने 48 डावांमध्ये हैदराबादकडून सहा शतकी भागीदारी नोंदवल्या आहेत. त्यांच्या 5 व्यासह, बेअरस्टो आणि वॉर्नर सर्वाधिक शतकी भागीदारी असलेल्या जोडीच्या यादीत पहिल्या 5 मध्ये प्रवेश केला. (SRH vs KXIP, IPL 2020: डेविड वॉर्नर-जॉनी बेअरस्टोने केली चौकार-षटकारांची बरसात, SRHचे किंग्स इलेव्हन समोर 202 धावांचे आव्हान)

इतकंच नाही आपल्या अर्धशतकी डावासह दरम्यान वॉर्नरने आयपीएलच्या इतिहासात अनोख्या विक्रमाची नोंद केली. आयपीएलमध्ये सर्वाधिक 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची वॉर्नरची ही 50वी वेळ होती. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज ठरला. वॉर्नरने हे कामगिरी केवळ 132 डावांमध्ये केली आणि त्याच्या 50हुन अधिक धावांमध्ये रूपांतरित होण्याची सुसंगतता दर्शविते. चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैना आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांनी 189 डावात 39 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.

आजच्या सामन्याबद्दल बोलायचे तर, सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. वॉर्नर आणि बेअरस्टोने टीमला जबरदस्त सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी केली. बेअरस्टो आजच्या सामन्यात 97 धावा करून माघारी परतला, तर वॉर्नरने 52 धावा केल्या. वॉर्नर-बेअरस्टोच्या सलामी जोडीने सुरुवातीपासून पंजाबच्या गोलंदाजांवर वर्चस्व कायम ठेवले आणि फटकेबाजी करत किंग्स इलेव्हन गोलंदाजांचा समाचार घेतला. आजच्या डावादरम्यान बेअरस्टोचे दुसरे आयपीएल शतक हुकले. एसआरएच फलंदाजाला फक्त 3 धावा कमी पडल्या. पण, पंजाबच्या रवी बिश्नोईने वॉर्नरला बाद करून दोघांची भागीदारी मोडली.